लोणी-झेंडीगुडा येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती साजरी ; विद्यार्थ्यांच्या वेशभूषेने मिरवणूकित आणली रंगत !
किनवट ( प्रतिनिधी ) :
क्रांतीवीर बिरसा मुंडाने आदिवासींच्या मनात राष्ट्राभिमान चेतविल्यानेच आदिवासींनी इंग्रजांच्या सत्तेला आव्हान दिले होते. असे प्रतिपादन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांनी केले. किनवट तालुक्यातील लोणी झेंडीगुडा येथे जननायक बिरसा मुंडा यांच्या १४७ व्या जयंती निमित ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच भीमराव कुरसंगे होते तर उद्घाटक म्हणून विजय पावडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक संजय लेंडे, मुख्याध्यापक परमेश्वर महामुने, राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल भालेराव, वनरक्षक चिबडे, सहशिक्षिका अनुसया वाकोडे, उपस्थित होते. रमेश मुनेश्वर पुढे म्हणाले की इंग्रजांच्या अन्याय अत्याचाराला जनता कंटाळली होती. वनात राहणारे आदिवासी ही त्यातून सुटले नव्हते. बिरसाने त्याला विरोध करत जंगल जल जमीनीसाठी तीव्र आंदोलन केले. आदिवासींना स्वतंत्र हवे आहे गुलामगीरी नको. असी त्यांची भूमिका होती.
स्वप्नील भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की बिरसांचे बलिदान खुप मोठे आहे. समाजातील तरुणाने शिकले पाहिजे आणी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे तरच आपला विकास होईल. यावेळी मुख्याध्यापक महामुने यांनीही आपले मनोगत मांडले ते म्हणाले की बीरसा मुंडाची जयंती भारतभर साजरी होत आहे त्यांचा आदर्श घेऊन समाजाने प्रगती करावी.
सकाळी गावातील प्रमुख मार्गाने क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा केली होती. घुसाडी नृत्याने मिरवणुकीत रंगत आणली. मिरवणूकित गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजू तलांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक सुरपाम, किरण पत्रे, संतोष मडावी, शंकर सुरपाम, ज्योतीराम सुरपाम, रमेश तोडसाम, माजी सरपंच राजू शेडमाके, प्रकाश तलांडे, मलकू तोडसाम, जनार्दन पेंदोर, पंकज मेश्राम, विनायक मेश्राम, गणपत नैताम, नागेश मेश्राम, अनिल तोडसाम, रोशन मेश्राम, अरविंद कुरसंगे, सिताराम मडावी, आकाश तोडसाम, ओंकार कुरसंगे, वसंता तोडसाम, चंद्रकांत सुरपाम, पवन तोडसाम, माणिक शेडमाके, नागेश शेडमाके, रोहित मेश्राम, आदींनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .