गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी विवाह सोहळ्यात वधू-वरास दिला संविधान ग्रंथ भेट !

शालेयवृत्त सेवा
0

 




सावंत-जाधव परिवाराने साजरा केला आगळावेगळा संविधान गौरवदिन 

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

दि. २६ नोव्हेंबर हा दिवस  संविधान गौरवदिन म्हणून विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. नांदेडचा सावंत परिवार आणि नाणेकरवाडी चाकण येथील जाधव परिवाराने यंदाचा संविधान गौरवदिन  आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. 


नांदेड येथील डॉ. सौ. मथुताई आणि डॉ. सुरेश सावंत यांचे धाकटे चिरंजीव डॉ. संकेत यांचा शुभविवाह नाणेकरवाडी चाकण (पुणे) येथील सौ. वनिताताई आणि तुकाराम जाधव यांची ज्येष्ठ कन्या डॉ. तनुश्री हिजसमवेत संविधानदिनी संपन्न झाला. 


संविधानात सांगितलेले स्त्रीपुरुष समतेचे तत्त्व आचरणात आणत, हुंडा परंपरेला छेद देत, विवाहसोहळा संपन्न केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी भारताचे संविधान भेट देऊन वधुवराचा गौरव केला. 


यावेळी वधुवराला शुभाशीर्वाद देण्यासाठी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, पुणे विभागाचे उपायुक्त श्री अनिल रामोड (आयएएस), सौ. विजयालक्ष्मी रामोड,  आरोग्य सहसंचालक (माजी) डॉ. सुभाष राजुळे, केंब्रिजच्या प्राचार्य रेवती गव्हाणे, डॉ. भगवान अंजनीकर, गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, दै. सकाळचे संपादक संदीप काळे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष भगवानराव आलेगावकर, पुणे येथील बिल्डर सौ. स्मिता धनराज पाटील, मारोतराव जाधव किन्होळेकर, साहित्यिक शिवाजीराव चाळक, कवी देवा झिंजाड, प्रा. नारायण शिंदे, पत्रकार आनंदराव कल्याणकर, विजयकुमार चित्तरवाड, अशोक सूर्यवंशी, डॉ. टी. बी. जाधव, बी. बी. कदम, डॉ. माणिक गाडेकर, आनंद मोरे यांच्यासह समाजकारण, राजकारण, साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, उद्योग, इ. विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संविधानदिनाचे औचित्य साधून कृष्णपिंगाक्ष हिल्सच्या निसर्गरम्य परिसरात पुरोगामी विवाहसोहळा संपन्न केल्याबद्दल उपस्थितांनी सावंत आणि जाधव परिवाराचे अभिनंदन केले. 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)