बालविज्ञान प. नंदुरबार जिल्हा विज्ञान प्रकल्प सादरीकरण स्पर्धेचे माध्यमिक शिक्षण विभाग जि. प. नंदुरबार व वात्सल्य सेवा समितीच्या वतीने संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान या विषयात गोडी निर्माण व्हावी व त्यांच्या स्वैर कल्पनांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी भारत सरकारकडून या विज्ञान परिषदेचे आयोजन दर वर्षी होत असते. यंदाचे हे ३० वे वर्ष असून याचे आयोजन या उपक्रमाची जिल्हा समन्वयक संस्था वात्सल्य सेवा समिती मार्फत दि १९ व २० नोव्हेबर रोजी डी. आर हायस्कूल येथे सकाळी १० ते ५ या वेळेत आयोजन केले होते. 


या उपक्रमासाठी इ ५ ते ७ व  इ ८ ते १२ असे २ गट करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यातून  एकूण २६८ प्रकल्प सादर करण्यात आले होते. यातील तज्ञ परीक्षकांमार्फत सोळा प्रकल्पांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहेत. यंदाच्या वर्षी या क्रमाचा मुख्य विषय  आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजावून घेणे असा असून  ५ उपविषय देण्यात आले आहेत. या सर्व विषयांवर जिल्ह्यातील विविध शाळातील विद्यार्थी प्रकल्प सादरीकरण करण्यात आले होते .


 तरी विज्ञान प्रेमी, विद्यार्थी ,पालक ,नागरिकांनी या उपक्रमास भेट द्यावी असे आवाहन मा. शिक्षणाधिकारी कार्यालय माध्यमिक विभाग जिल्हा परिषद नंदुरबार व वात्सल्य सेवा समिती नंदुरबार तथा या उपक्रकमाचे शैक्षणिक समन्वयक श्री पंकज पाठक, जिल्हा समनव्ययक श्री आशिष वाणी व मिलिंद वडनगरे व वात्सल्य समितीने केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)