राज्यस्तरीय राज्य पुरस्कार स्काऊट चाचणी शिबीरास बुलढाणा जिल्ह्याचा उत्कृष्ट व मोठ्या प्रमाणात सहभाग

शालेयवृत्त सेवा
0

 



औरंगाबाद ( शालेय वृत्तसेवा ) :

दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ते 1डिसेंबर 2022 या कालावधीत मध्ये भारत स्काऊट्स गाईड्स कार्यालय प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद विभागातील औरंगाबाद,जालना, परभणी,बीड , हिंगोली जिल्हे तर अमरावती विभागातील बुलढाणा जिल्हा असून राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबीर  मध्ये एकुण 65 स्काऊट व 13 स्काऊटर मास्टर यांनी सहभाग घेतला आहे. 


राज्य स्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबीराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले. या शिबिरा मध्ये सर्वाधिक बुलढाणा जिल्ह्यातील एकुण 6 शाळा व 32 स्काउट्स व 7 स्काऊटर मास्टर यांनी  उत्स्फूर्त व मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला आहे. बुलढाणा जिल्हा हा कर्तृत्ववाने नेहमी अग्रेसर असतो. औरंगाबाद विभागातील इतर जिल्हा पेक्षा बुलढाणा जिल्हा हा नेहमी अव्वलस्थानी असतो. बुलढाणा जिल्ह्यांचे उत्कृष्ट जिल्हा संघटक श्री.सुभाष आठवले सर हे भारत स्काऊट ट गाईड्स या चळवळीसाठी साठी नेहमी तळमळीने काम करतात तसेच बुलढाणा जिल्हा हा नेहमी अग्रेसर राहावा यासाठी तत्परतेने  कार्य करत असतात. आणि म्हणूनच त्यांची नेहमी तळमळ यशामध्ये रूपांतरित होत असताना दिसत असते. 


स्काऊटचा अभ्यासक्रम हा तीन वर्षाचा असतो प्रथम सोपान द्वितीय सोपान आणि तृतीय सोपान हे पूर्ण केल्यानंतर राज्य पुरस्कार चाचणी पात्रता परीक्षा देता येते. तसेच राज्य पुरस्कार चाचणी शिबिरामध्ये अनेक परीक्षा असतात आणि या परीक्षेतून जो स्काऊट उत्तीर्ण होईल त्यांना राज्याचे राज्यपाल यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळत असते त्यामुळे त्या स्काऊटच्या जीवनात अतिशय उपयोग होतो. राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरामध्ये उत्कृष्ट स्काऊटर श्री सतीश कुमार ओंकार पडूळकर सर जनता विद्यालय सावखेड तेजन तसेच जीवन विकास  कॉन्व्हेंट व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री निलेश राठोड सर छत्रपती शाहू महाराज विद्यालय पेन टाकळी चे उत्कृष्ट सूत्रसंचलन, स्काऊटर  श्री.विनोद गणेशकर सर तसेच सहकार महर्षी भास्करराव शिंगणे माध्यमिक विद्यालय चांगेफळ तालुका सिंदखेडराजा चे उत्कृष्ट स्काऊटर व आपत्ती व्यवस्थापन तज्ञ मार्गदर्शक  लेखक, कवी श्री बाबाराव डोईजड व  नेहरू विद्यालय अंत्री खेडेकर श्री.विनोद सावळे सर व दिपक राऊत सर तसेच सरस्वती विद्यालय डिडोळा चे विरेंद्र चव्हाण यांनी सहभाग नोंदविला. 


राज्य स्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबीर प्रशिक्षण केंद्राचे शिबीर प्रमुख म्हणून श्री.मधुकर घोडके (एल.टी.)(एस) तर शिबीर सहाय्यक श्रीनिवास मुरकुटे, जिल्हा संघटक स्काऊट औरंगाबाद तसेच बुलढाणा जिल्हा संघटक श्री सुभाष आठवले तसेच परभणी जिल्हा संघटक श्री मिलिंद तायडे श्री आनंद पाटील रेजिमेंटल चिल्ड्रन हायस्कूल औरंगाबाद इत्यादी सहाय्य करणार आहेत त्याचप्रमाणे औरंगाबाद विभागाच्या विभागीय प्रभारी तथा जिल्हा संघटक गाईड प्रियाताई अधाने व जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड श्रीमती वैशालीताई आठवले यांनी सदर शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत . अतिशय शिस्तबद्ध व परिपूर्ण असे पार पडत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)