विद्या गौरव आमलाड येथे भारतीय संविधान दिन साजरा

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( पुलायन जाधव ): 

विद्या गौरव प्रायमरी,गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कुल व महिला महिला महाविद्यालय आमलाड ता.तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन व २६/११ शहीद दिन साजरा करण्यातआला.  अध्यक्षस्थानी ललित पाठक हे होते तर प्रमुख पाहुणे मोरे महिला महाविद्यालय चे प्राचार्य किरण वळवी,वरिष्ठ शिक्षक किरण वसावे,संजय मोरे,क्रीडा शिक्षक पुलायन जाधव हे होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थितांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार टाकून पूजन केले व भारतीय संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले.त्यांनतर विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान दिना निमित्त आपले विचार मांडले. जेष्ठ शिक्षक निलेश ढोढरे,क्रीडा शिक्षक पुलायन जाधव,अमरसिंग वळवी यांनी संविधान दिन व शहीद दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी भारतीय संविधान सामूहिकरीत्या म्हणण्यात आली त्यानंतर २६/११च्या शहीद दिनाला शहीद झालेल्याला शहीद जवानाना श्रद्धांजली वाहण्यात आली.


 प्रास्तविक व सूत्र संचालन  शिक्षिका रंजना शिंदे यांनी केले तर शेवटी आभार मयुरी पवार यांनी मानले यावेळी शाळेचे शिक्षक,शिकशेतर कर्मचारी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)