कोण होणार गणित विजेता? नावीन्यपूर्ण उपक्रम !

शालेयवृत्त सेवा
0

 



अल अमीन मराठी प्रायमरी  शाळेत अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक नावीन्यपूर्ण उपक्रम


सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :

शंभर फुटी रोड येथील सरोवर शिक्षण मंडळ संस्थेतील अल अमीन मराठी प्रायमरी स्कूलमध्ये एक नावीन्यपूर्ण अद्भुत असा उपक्रम राबविण्यात आला ते म्हणजे कोण होणार गणित विजेता? या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती वर आधारित गणित विषयांमधील 100 प्रश्न झेरॉक्स मारून देण्यात आले.

 

विद्यार्थी हे स्वतः प्रश्न सोडवून एका महिन्यानंतर त्याची KBC सारखे कॉम्प्युटर वरती 50 प्रश्नाचे निवडून त्या प्रश्नांची स्लाईट करून कॉम्प्युटर वरती विद्यार्थ्यांना एक एक करून प्रश्न विचारण्यात आले.


प्रत्येक वर्गातील तीन क्रमांक काढून त्यांना मेडल व रोख रक्कम या उपक्रमाचे आयोजक सौ.अस्मा अमजदखान नदाफ यांच्याकडून देण्यात आले. या उपक्रमासाठी तनवीर मुल्ला व सर्व शिक्षक मुख्याध्यापक सौ.शहनाज मुल्ला यांचे सहकार्य लाभले व संस्थेचे पदाधिकारी संस्थेचे संस्थापक हाजी मुनुरुद्दीन मुल्ला सर अध्यक्ष एफ.एम.अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)