उमरी जहागीर येथील जिल्हा परिषद शाळेत ऍस्ट्रॉनॉमिक क्लब च्या वतीने खगोल विश्व दिन निमीत्त विविध कार्यक्रम संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( सोनबा दवणे ) :

जिल्हा परिषद आदर्श शाळा उमरी जहागीर ,केंद्र पाथरड, विभाग आष्टी,तालुका हदगाव जिल्हा नांदेड ,येथे दिनांक 1 ऑक्टोबर 2022  शनिवार रोजी ऍस्ट्रॉनॉमिक क्लब च्या वतीने खगोल विश्व दिन निमीत्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. नियमाप्रमाणे शालेय परिपाठ पिंपळाच्या विस्तीर्ण अशा झाडाखाली निसर्गाच्या कुशीत घेण्यात आला.


परिपाठानंतर भारताचे थोर सुपुत्र श्री मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी आणि भारताचे माजी प्रधानमंत्री श्री लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन   शाळेचे मुख्याध्यापक श्री दवणे सर , गावातील ज्येष्ठ नागरिक शाळेचे माजी विद्यार्थी श्री फाळके साहेब , अहमदनगर येथून आलेले श्री दीपक जेठे सर हास्य सम्राट यांच्या हस्ते करण्यात आले.



मान्यवरांच्या स्वागता नंतर शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री जे.डी सूर्यवंशी सर यांनी, पृथ्वी गोल या साहित्याद्वारा आपले घर, गाव, तालुका ,जिल्हा ,विभाग ,राज्य देश, खंड,  दाखवून त्यावरील जमीन व पाण्याची प्रमाण ,अक्षांश रेखांश, अक्षवृत्ते, आकाशातील विविध प्रकारचे ग्रह, तारे ,ग्रहणे अशा विविध प्रकारची माहिती भूगोल दिनानिमित्त विद्यार्थ्यांना दिली.


मुख्याध्यापक श्री दवणे सर यांनी परिवलन आणि परिभ्रमण ही संकल्पना विद्यार्थ्यांना कृतीतून समजावून दिली. सर्व विद्यार्थ्यांनी शक्तिमान च्या रुपात स्वतःभोवती फिरले आणि परिवलन संकल्पनेचा आनंद लुटला. तसेच पिंपळाच्या गोल ओटा ,पार हा सूर्य समजून शाळेतील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी अनुजा राहुल मुनेश्वर हिने स्वतः पृथ्वी बनून स्वतःभोवती फिरत फिरत गोलओटा पार ला सूर्य समजून त्याच्या भोवती परिभ्रमण केले. आणि परिभ्रमण ही संकल्पना सर्व विद्यार्थ्यांनी अनुभवली.



शाळेतील दुसरे विज्ञान शिक्षक श्री ओम प्रकाश सूर्यवंशी सर यांनी विज्ञानाच्या गमती जमती सांगितल्या. शाळेत असलेल्या दुर्बिणी द्वारे आकाशाचे निरीक्षण कसे करतात यासंबंधी मार्गदर्शन केले तसेच दुर्बिणी द्वारा विद्यार्थ्यांना 100 मीटर दूर उभे करून  दुर्बिणी मधून त्यांच्या गळ्यातील त्यांचे ओळखपत्र वाचायला लावले. दूर असणाऱ्या विविध झाडाचे, पानाचे , वस्तूंचे  निरीक्षण करायला दिले. इतर शिक्षकांनीही दुर्बिणीमधून निरीक्षण केले. 


शाळेची माजी विद्यार्थी श्री फाळके साहेब यांनी पूर्वीची उमरी जहागीर ची हायस्कूल असलेली शाळा शाळा आणि आताची आदर्श शाळा याबद्दल शाळेतील बदल सांगितला. पूर्वीच्या काळी उमरी जहागिर शाळा पहिली ते दहावीपर्यंत होती. पण शाळेला खोली संख्या कमी असल्याने गुरुजन वर्ग त्यांना शाळेच्या भोवती असलेल्या लिंबाच्या चिंचेच्या झाडाखाली शाळेचे वर्ग भरवित असल्याचे सांगितले. आणि त्या लिंबाच्या ,चिंचेच्या झाडाखाली त्यांनी शिक्षण घेतल्याचे सांगितले. ती झाडे आजही त्याची साक्ष देत उभी आहेत. आणि आम्हाला समजले की शाळेभोवतीची झाडे सुद्धा शिक्षणाची खोली म्हणून कार्य केले. शाळेचे वैभव आणि शिक्षकाचे कार्य पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले .शाळेतील सर्व शिक्षकाचे  अभिनंदन करून शाळेसाठी मदत लोकसहभाग म्हणुन पाचशे रुपये मुख्याध्यापकाकडे जमा केले.



यानंतर खरी रंगत कार्यक्रमांमध्ये आली. शाळेचे  ऍस्ट्रॉनॉमिक क्लबचे सचिव विषय शिक्षक श्री अरविंद सूर्यवंशी सर यांनी भूगोल दिनानिमित्त अहमदनगर येथील प्रसिद्ध हास्य सम्राट दीपक जेठे सर यांना विनंती करून आमंत्रण देऊन शाळेमध्ये घेऊन आले. आणि त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना हास्याचे फवारे उडवत चिंब भिजवून ठेवले. आपल्या अभिनयाच्या जोरावर विविध विषयाला उचित न्याय देऊन  हसायला लावले घर ,गाव, परिसर स्वच्छता ठेवण्यासाठी अनेक उदाहरणे देऊन विविध रोगापासून आपला बचाव करण्याची सांगितले. बालविवाह, करू नका शिक्षण घ्या असा संदेश दिला.


वडाच्या  झाडाचे पिंपळाच्या झाडाचे महत्व कार्बन डाय-ऑक्साइड अक्षय पुरवठा करणारे नैसर्गिक यंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.पृथ्वीवर हवा शुद्ध ठेवण्यासाठी झाडांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. एका पिंपळाच्या पानाची किंमत किती करता येईल? याबद्दल उदाहरण देऊन स्पष्ट केले . वड, पिंपळचे वृक्ष  लावावी ,एरंड, निलगिरी सारखी नको. रस्त्याच्या कडेने चालायचं , रस्त्यामधून  चालायचं नाही. अभिनय गीतातून त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.



मनोरंजना मधून विविध विषय समजावून सांगितले. त्यांनी सांगितले माणूस आणि गाढवातील फरक यावर बोलताना विद्यार्थ्यांची बोबडी वळली. काही विद्यार्थी यांनी माणसापेक्षा गाढवे चांगली म्हणून त्यांच्या तुम्ही माणूस बनणार की गाढव या प्रश्नाला काही बाल विध्यार्थी यांनी गाढव म्हणुन दाद दिली . आणि हास्याचा एकच  टाळ्यांचा गडगडाट झाला. शाळेतील शिक्षिका श्रीमती वडजेमॅडम यांनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने सर्व विद्यार्थ्यांसाठी गोड चॉकलेटचे वितरण केले सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त गीत आणि टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या. आनंद व्यक्त केला आणि कार्यक्रमाचा गोड शेवट झाला. या कार्यक्रमासाठी शाळेतील गावातील माजी विद्यार्थी तसेच पालक वर्ग शालेय पोषण शिजवणारा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री दवणे सर पदवीधर शिक्षक श्री देवडे सर विषय शिक्षक श्री अरविंद सूर्यवंशी सर श्री ओम प्रकाश सूर्यवंशी सर श्री जेडी सूर्यवंशी सर श्री धनवे सर श्री पाटील सर श्री जाधव सर श्रीमती फुले मॅडम श्रीमती वडजे मॅडम श्रीमती आलोने मॅडम सर्वांनी सहकार्य केले. शाळेतील सदाबहार व्यक्तिमत्व श्री जे डी सूर्यवंशी सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)