रत्नाळी केंद्राची चौथी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी केंद्राची चौथी शिक्षण परिषद पाटोदा (बु.) येथील के.एम.पाटील माध्यमिक विद्यालय येथे दि.३० सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. एम. पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख आबासाहेब उस्केलवार, गटसाधन केंद्राचे साधनव्यक्ती आर. आर. खाटे हे होते. कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. 


यानंतर शाळेतील विद्यार्थीनी कु. चंद्रकला सुर्यवंशी हिच्या सुमधुर स्वागतगीताने सर्वांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी रत्नाळी केंद्रातील कन्या शाळेतील दिवंगत मुख्याध्यापक एम. एन. कागेरू व दि.२९ सप्टेंबर रोजी वीज पडून मृत्युमुखी पडलेली जिजामाता कन्या शाळेतील दिवंगत विद्यार्थीनी स्वाती आवरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर गटसाधन केंद्राचे साधनव्यक्ती आर. आर. खाटे यांनी प्रास्ताविक केले. प्रथमतः पी. जी. पालेंचवार यांनी विद्याप्रवेश उपक्रमात माता पालक गट व  माता पालक लिंक कशी भरावी या विषयी माहिती दिली. 


इंग्रजी विषयात मुलांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी read to me ऍप, तेजस व  PGI याविषयी एल. एन. गुडलावार यांनी मार्गदर्शन करुन प्रत्यक्ष कृती करुन घेतली. पहिली द्विभाषिक पुस्तक यावर एम. डी. भोसले यांनी सखोल मार्गदर्शन केले. शेवटच्या तासिकेत नासा येवतीकर यांनी विद्यांजली, आझादी का अमृत महोत्सव व एक भारत श्रेष्ठ भारत या विषयी छान वातावरण निर्मिती करून विविध उपक्रमाविषयी सकरात्मक चर्चा घडवून आणली व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन येथील इंग्रजी विषयाचे शिक्षक कुणाल पवारे यांनी केले तर  डी. आर. गबाळे यांनी उपस्थित शिक्षकांचे आभार मानले. 


कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी के. एम. पाटील माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक डी. वाय. शिंदे,  बी. यु. नरवाडे, टी. आर. भारसावडे, एस. व्ही. रामपुरकर,  डी. आर. गबाळे, एस. डी. नरवाडे, आर. एल. हंबर्डे, उदय पाटील पवार, कुणाल पवारे, व्हि.जी.पपुलवाड यांच्यासह के. आर. वाघमारे, व्हि. व्हि. गट्टुवार, जी. एम. जालनेकर, एम. बी. शेख आदीनी परिश्रम घेतले. उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात रत्नाळी केंद्राचे चौथे शिक्षण परिषदत संपन्न झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)