मदनापूर शाळेत प्रधानसांगवी केंद्राची शिक्षण परिषद संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

  



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील  प्रधानसांगवी केंद्राचे केंद्रस्तरिय शिक्षण परिषद प्रा.शा. मदनापूर येथे नुकतीच संपन्न झाली. सदरील परिषदेच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती मदनापूरचे अध्यक्ष अनिल पवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख ग.नु.जाधव, तालुका गटसमनव्यक संजय कांबळे, केंद्रीय मुख्याध्यापक विजय आढागळे,पदोनन्त मु.अ.कैलास पाटील आदीची उपस्थिती होती.


श्री सरस्वती मातेच्या प्रतिमेच्या पूजनेनंतर  शासन स्तरावरून आदेशीत विविध उपक्रम तथा गुणवत्ता विकास वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना याविषयी सुलभक म्हणून कार्य पाहणारे तिडके व सारंग घुले या शिक्षकांनी मार्गदर्शन केले, प्रशासकीय सूचना व विविध उपक्रमाचा उलगडा केंद्रप्रमुख ग.नु.जाधव यांनी केला.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रस्तुत शाळेचे मुख्याध्यापक उत्तम बाबा चव्हाण,शिक्षक गणेश राठोड यांनी परिश्रम केले.कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रा शा दरसांगवीचे मुख्याध्यापक युवराज वाठोरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)