नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :
शहादा तालुक्यातील जि.प शाळा वैजाली शाळेचा रौप्य महोत्सव निमित्तानं शैक्षणिक सहल उनपदेव येथील गरम पाण्याचा झरा उनपदेव येथे असल्याने हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. निसर्गरम्य उंच सातपुडा पर्वतातील पायथ्याशी असलेल्या उनपदेवचा परिसर एक पर्यटनस्थळांची माहिती व्हावी. उंच डोंगर आणि जंगलाचा परिसर असल्याने संपूर्ण परिसरात एक वेगळीच शांतता अनुभवयाला मिळाली. दुर्मिळ पक्ष्यांचा सहवासदेखील या जंगलात लाभतो. येथे साग, आवळा, सिताफळ, पळस जांभळा, हिरडा, झाडे मोठ्या प्रमाणावर दिसतात. त्याचप्रमाणे या परिसरात आदिवासींची लहान लहान पाडेदेखील अनुभवायला मिळाले.
शिंदीश्वर मंदिर, संतोषी माता मंदिर, गरम पाण्याचे दुय्यम स्नानकुंड, वनभोजनासाठीची व्यवस्था शाळेतील मुलांसाठी करण्यात आली होती. घनदाट वनराई, धरण, धबधबा, निसर्गरम्य बाग, फुलझाडे, नदीत पोहण्याचा आनंद शिक्षक, विद्यार्थ्यांनी घेतला. यामुळे या परिसराचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सहलीतून विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञान, विज्ञानाबरोबर धम्माल मस्ती करून निसर्गाशी मैत्री वेगवेगळ्या वनस्पती आणि पक्षांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षणाऐवजी अनुभवात्मक शिक्षण देण्याच्या उद्देशाने या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळांचा आनंद घेत मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी भौगोलिक, सजीव सृष्टी, झाडे आदींची माहिती या सहलीमध्ये सहभागी शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना दिली. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुदाम पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांचा विकास व विचारांना चालना देणे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना शिस्त व निसर्ग प्रेमाचे धडे देत नाविन्यपूर्ण उपक्रमात सहलीचे आयोजन करण्यात आले होते. वर्गाच्या चार भिंतीच्या बाहेर असणाऱ्या निसर्गाचे दर्शन घडावे, विद्यार्थ्यांना अभ्यासातून सुटका मिळावी व मनोरंजनही व्हावे या हेतूने या सहलीचे आयोजन करण्यात आले.
परिसरातील ऐतिहासिक व भौगोलिक माहितीसाठी सहल आयोजित केली. विद्यार्थ्यांनी आनंदाबरोबरच निरीक्षणातून माहिती घेतली. उनपदेव स्थळ पाहून मनसोक्त आनंद घेतला. सहकार्य गटशिक्षणाधिकारी डि.टी.वळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण पाटील, चंद्रशेखर पाटील, शरद पाटील, कविता सोमवंशी, सुरेखा पाटील सहलीत सहभागी शिक्षकवृंद भरत पावरा,चंदू पाटील, उषा पाटील,राजू मोरे, गोपाल गावीत आदी शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .