10 आणि 20 च्या आत पटसंख्येच्या शाळेवरील होणार शिक्षकांचे समायोजन..

शालेयवृत्त सेवा
0

 



बीड ( शालेय वृत्तसेवा ) :

शुन्य, 1 ते 10 व 11 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळेवरील शिक्षकांच्या समायोजन करण्यासाठी आवश्यक माहिती बाबत. शुन्य ते 05 व 06 ते 10 पटसंख्या असलेल्या शाळेवरील शिक्षकांच्या समायोजना बाबतचा आपला माहितीचा अहवाल मागविण्यात येत आहे.


उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, आपण उक्त संदर्भिय अहवाला द्वारे शुन्य ते 05 व 06 ते 10 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेवरील प्राथमिक शिक्षकांची माहिती या कार्यालयास सादर केलेली आहे. 


प्रकरणात सदर माहितीच्या आधारे जिल्हा परिषद शाळेवरील प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही प्रस्तावीत करण्यात येत आहे. या समायोजन प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 18/05/2011 अन्वये खालील प्राधान्य क्रमाद्वारे जेष्ठता यादी तयार करण्याच्या सुचना आहेत. करिता खालील संवर्गात मोडत असलेल्या शिक्षकांचे प्रमाणपत्र / अभिलेख तपासणी करून संबधितांची नावे तात्काळ कळवावीत व सदर प्रमाणपत्र / अभिलेख सुनावणी वेळी स्वतः गशिअ यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड यांचे समक्ष सादर करावेत.


1.विधवा

2.परितक्त्या/कुमारिका

3.दिव्यांग कर्मचारी

4.स्वतः गंभिर आजाराने त्रस्थ कर्मचारी ( जिल्हा शल्यकित्सक यांचे प्रमाणपत्र / प्रतिस्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र आवश्यक)

5.सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी. 

6.पती पत्नी एकत्रीकरण

7. तालुकावास्तव्य जेष्ठतेनुसार जेष्ठ असलले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)