जिल्हा परिषद शाळेत डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा उमरी जहागीर तालुका हदगाव जिल्हा नांदेड शाळेत भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन  महोत्सव आणि हात धुवा दिन  दिनांक 15/10/2022 रोजी मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरा करण्यात आला.



भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा आणि त्यांचें आत्मचरित्र ,, अग्निपंख ,,यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री आनंदरावजी गुडमूडके, उपस्थित सर्व सदस्य ,मुख्याध्यापक श्री दवणे सर व उपस्थित सर्व शिक्षक यांनी पुष्प हार अर्पण करून वंदन करण्यात आले. 


शाळेच्या प्रांगणामध्ये अध्यक्ष , सदस्य,मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत शाळेतील सहशिक्षिका श्रीमती आलोने  मॅडम यांनी त्यांची  सुकन्या  कु श्रिजा ,, हिच्या प्रथम वाढदिवसानिमित्त शाळेतील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पेन  भेट देन्यात आली.


 विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री ओम सूर्यवंशी सर यांनी सामान्य ज्ञान चाचणीचे पेपर काढून 13/10/2022 तारखेला सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांचे क्रमांक काढले . यामध्ये प्रथम क्रमांक श्रीमती आलोने मॅडम,  द्वितीय क्रमांक श्री दवणे सर आणि तृतीय  क्रमांक श्री ओम  सर यांच्या वतीने नगदी बक्षीस ठेवण्यात आले.



सामाजिक शास्त्रावर सुद्धा प्रश्नपत्रिका काढून सामान्य ज्ञान चाचणी घेण्यात आली आणि यातील विद्यार्थ्यांना नगदी स्वरूपामध्ये सामाजिक शात्र विषय शिक्षक श्री अरविंद सूर्यवंशी सर यांच्या तर्फे नगदी बक्षीस आणि परीक्षेचे  pad वाटप करण्यात आले.


उमरी जहागीर शाळेतील माजी विद्यार्थी व वसमत येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य असलेले आणि या 2022 वर्षी  शैक्षणिक साहित्य शाळेसाठी दान करनारे श्री कदम साहेब नांदेड यांचे कडून परीक्षेतील विद्यार्थ्यांना रजिस्टर वही भेटठेवण्यात आले.


वरील सर्व शैक्षणिक साहित्य आणि सर्व रक्कम शाळा  व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री आनंदराव गुडमुडके व  सदस्य श्री आमृते ,श्री रामा खानजोडे श्री ग्रामपंचायत सदस्य श्री कावळे सदस्य प्रतिनीधी श्री पुंडलिक खानजोडे, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या उपस्थित यशस्वी यशस्वी विद्यार्थ्यांना देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.


शाळेतील शिक्षक आदरणीय श्री जे डी सूर्यवंशी सर सर्व विद्यार्थ्यांना जागतिक हात  धुवा दिन उपक्रमांतर्गत हात धुण्याचे महत्त्व समजून सांगितले स्वतः धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. आणि श्री अरविंद सूर्यवंशी सर, श्री ओम सूर्यवंशी सर, श्री धनवे सर, श्री जाधव सर, श्री पाटील सर श्रीमती फुले मॅडम श्रीमती,वडजे मॅडम श्रीमती आलोने  मॅडम सर्व शिक्षक वृंद यांनी शाळेतील वर्ग तिसरी ते आठवी मधील विद्यार्थ्यांना गोष्टीचा शनिवार या उपक्रमांतर्गत शाळेच्या वाचनालयातील पुस्तके देण्यात येऊन सर्व विद्यार्थ्यांचे वाचन करून घेतले . आणि वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला .


शासनाच्या आदेशानुसार माहे .ऑक्टोबर २०२२ या महिन्याची शाळा व्यवस्थापन समिती उमरी ज.ची सभा शाळेच्या कार्यालयात घेण्यात आली .त्यानिमित्त शिक्षक प्रतिनिधी सदस्य श्री देवडे सर यांनी शासनाचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक FLN धोरण, विद्यार्थ्यांची गुणवत्ता याबद्दल सर्व सदस्यांना माहिती सांगितली. शाळेतील इतर विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते साठी येणारे अडथळे मुलीसाठी नवीन स्वच्छता संकुल, शालेय गणवेश वाटप अशा विविध विषयावर चर्चा करून सर्व ठरवाला मंजूरी देण्यात आली. अशा प्रकारे मासिक सभा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे घेण्यात आली.


 

शाळेतील उर्वरित राहिलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी कार्यानुभवातून दिवाळी शुभेच्छा कार्ड आणि दीपावलीचे आकाश कंदील केले . ते विकत घेण्यापेक्षा स्व निर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. त्याच्या कल्पकतेला चालना मिळाली. 



दिवाळीचा खाऊ म्हणून विविध छंद कला जोपासण्याचा तसेच अभ्यास करण्याचा आणि या सुट्टीचा चांगला उपयोग करण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला दिवाळीच्या खाऊ म्हणून देण्यात आला. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा. देऊन 2022 ते विचार पहिल्या शैक्षणिक क्षेत्राचा समारोप करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)