शैक्षणिक विचार मंथनाने केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेची सांगता

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

सप्टेंबर महिन्याची चौथी केंद्रीय शिक्षण परिषद  दिनदयाल माध्यमिक  विद्यालय  बेटसांगवी  येथे मुख्याध्यापक  युक्रांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे  म्हणून  शेवडी केंद्राचे केंद्रप्रमुख  नागोराव जाधव, केंद्रीय मुख्याध्यापक  आनंदा नरवाडे, अशोक  राऊत, ज्ञानोबा मोरे हे  उपस्थित होते.


कार्यक्रमांची सुरुवात माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलानाने व  कै. भा . ग . देशपांडे यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . राधा वानखेडे  या विद्यार्थीनीने  प्रभावी भाषण  करुन सर्वांचे मन जिंकले.  दुसऱ्या चरणात- शिक्षण परिषदेचे विषय घेण्यात आले. PGI- आझादी का अमृत महोत्सव -   चंद्रकांत लामदाडे, विद्यांजली - विद्याप्रवेश -  रमेश कोल्हे, एक भारत श्रेष्ठ भारत - इ.1 ली पाठ्यपुस्तक समलोचन - परमेश्वर  रासवदे  माता पालक गट - Read to all & TEJAS -  कदम  या साधनव्यक्तीने उपरोक्त विषयांचे विवेचन केले..केंद्रप्रमुख  नागोराव् जाधव यांनी एकंदरीत सर्व विषयांबद्दल मार्गदर्शन केले.केंद्रीय मु.अ. नरवडे सर यांनी प्रशासकीय आढावा घेतला.



केंद्रप्रमुख श्री.नागोराव जाधव  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात श्री युक्रांत देशपांडे सरांनी काळाप्रमाणे सर्वांनी बदलून अध्यपण क्षेत्रात परिपूर्ण योगदान देण्याचे सर्व शिक्षकांना आवाहन  करून कार्यक्रमाची सांगता केली . प्रास्ताविक आनेराये यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शिलकंठम एस . एन   यांनी केले. शेवटी आभारप्रदर्शन - श्री.जवादवार सर यांनी केले. खेळी मेळीच्या वातावरणात व निसर्गाच्या सानिध्यात ही शिक्षण परिषद शैक्षणिक विचार मंथनाने संपन्न झाली याबद्दल केंद्रप्रमुखांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)