शिक्षकांनी तब्बल तीन लाखाचा निधी दिला मयत शिक्षक गोविंद तितरे यांच्या कुंटूबास ; शिक्षकांनी दाखविले माणुसकीचे दर्शन

शालेयवृत्त सेवा
0

 


   

शिक्षक भारतीच्या आवाहनास उत्स्फुर्त प्रतिसाद


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन शिक्षक भारती संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत माहुर व किनवट तालुक्यातिल सर्वच संघटनांच्या सहकार्याने शिक्षकांनी तब्बल तीन लाखाचा निधी मयत शिक्षक गोविंद तितरे यांच्या कुंटूबीयास नुकताच देण्यात आला. शिक्षकांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतूक होत आहे. 


माहुर तालुक्यातिल कुपटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोविंद सुंदरसिंग तितरे यांचे वयाच्या अवघ्या तेहतिसाव्या वर्षी दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन लहान मुली, पत्नी, वृद्ध आईवडील, भाऊ आहेत. ते शिक्षक, विद्यार्थी व समाजामधे प्रिय होते. त्यांच्या पश्चात सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन शिक्षक भारती संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत माहुर व किनवट तालुक्यातिल सर्वच संघटनांच्या सहकार्याने शिक्षकांनी तब्बल तीन लाखाचा निधी मयत शिक्षक गोविंद तितरे यांच्या मुळ गावी मथुरा तांडा ता. किनवट येथे त्यांच्या अर्धांगीणीस सुपुर्त करण्यात आला.

   

यावेळी शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष अरविंद जाधव, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चारोडे, जुनी पेंशन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख जगताप, मुख्याध्यापक नामदेव राठोड, केंद्रप्रमुख सुरेश मोकले, अनंतवाडीचे मुख्याध्यापक आशिष माहुरे, संतोष किडे, विष्णु राऊत, सुदाम राठोड, दत्त्ता पहाडे यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)