मुंबई, दि. 6: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक शशिकांत कुलथे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर शुक्रवार दि. 7 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.
शिक्षण क्षेत्रातील मानाचे असलेले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारार्थीमध्ये बीडचे शिक्षक शशिकांत कुलथे यांचा समावेश आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दिलखुलास कार्यक्रमात माहिती जाणून घेतली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा असल्याचे श्री. कुलथे यांनी सांगितले आहे. निवेदक प्रा.आजीनाथ शेरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .