सद्यस्थितीमध्ये काही प्रशिक्षणार्थी यांना काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षण सुरु करण्यात / पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण प्रलंबित असल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत http://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सदरची दुरुस्ती प्रक्रिया ही केवळ ज्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण अद्यापही सुरु नाही अशाच प्रशिक्षणार्थी यांचेसाठी आहे याची नोंद घ्यावी. आवश्यक दुरुस्ती केल्यानंतरच्या कार्यवाहीबाबत देखील http://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेले आहे.
उक्त नमूद दुरुस्ती सुविधा सर्व उर्वरित प्रशिक्षणार्थी यांना दिनांक २१.१०.२०२२ ते ३१.१०.२०२२ या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .