राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये उपक्रमशील शिक्षिका अलका पाटील यांच्या शैक्षणिक साहित्यास मिळाला द्वितीय क्रमांक

शालेयवृत्त सेवा
0

 



प्रहार शिक्षक संघटनेमार्फत केला सत्कार !


नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य ( प्राथमिक शिक्षकांचे ) प्रदर्शन व स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने या वर्षाकरिता प्राथमिक शिक्षकांनी तयार केलेल्या ( गणित व विज्ञान ) शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या चालू वर्षात सत्र २०२२-२३ या वर्षाची राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य ( प्राथमिक शिक्षकांचे ) प्रदर्शन व स्पर्धा  प्राथमिक शिक्षक म्हणजे इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिकविणारे शिक्षक गटातून तरी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा मोगरा येथील  शिक्षिका अलका अशोक पाटील या ठिकाणी कार्यरत आहेत. 


या स्पर्धेतून राज्यस्तरावर उत्कृष्ट विज्ञान खेळणी या प्राथमिक शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याची निवड कारण्यात आली होती .पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेच्या महिला शिक्षिकेला आणि ते ही सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम भागातून विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकांचे यश प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई, जिल्हा संघटक गणेश पाटील,पियुष पाटील यांनी सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 


४९ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे अनुषंगाने तालुका व जिल्हास्तरीय विज्ञान , गणित व पर्यावरण प्रदर्शन २०२२-२३ आयोजित करण्यात आले होते. एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली च्या संदर्भीय दिशानिर्देशान्वये विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय " तंत्रज्ञान आणि खेळणी " प्रोद्योगिकी व खिलोने ” असा निश्चित केलेला होता. सामाजिक, पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून पुढीलप्रमाणे एकूण सहा उपविषय निर्धारित केलेले होते, पर्यावरणास अनुकूल सामग्री, आरोग्य आणि स्वच्छता, सॉफ्टवेअर आणि अँप्स, वाहतूक / परिवहन, पर्यावरण आणि हवामान बदल,गणितीय मॉडेलिंग विविध विषयांवर स्पर्धेत सहभाग घेतला. 


मोलगी केंद्रातील मोगरा शाळेच्या नाविन्यपूर्ण कल्पनांची कास धरून विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या वाटा सहज सोप्या करून देणाऱ्या उपक्रमशील उपशिक्षिका श्रीमती अलका अशोक पाटील यांची न भूतो न भविष्यती अशी कामगिरी मोलगी केंद्रच नव्हे तर नंदुरबार जिल्ह्यातील शैक्षणिक वाटचालीत एक नवीन पर्व आपल्या अद्भुत कामगिरीने सुरू केलेले आहे. मुलांना खेळायला आवडते. ते ज्या खेळण्यासोबत खेळतात त्या प्रत्येक खेळण्यामागे विज्ञान आहे. हे विज्ञान विद्यार्थ्यांना खेळण्यातून सांगितले तर त्यांचे शिकणे सोपे होईल व विषयाची आवड निर्माण होईल. म्हणून खेळातून विज्ञान संकल्पनांची समज, संकल्पनांचे दृढीकरण,सहजरीत्या अध्यनिष्पत्तीवर प्रभुत्व, पाठांतरावर भर न देता प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण या उद्दिष्टांवर आधारित इ.१ ते ८ करिता जवळपास ३४ विज्ञान संकल्पना आधारित आहे ही खेळणी तयार केली आहेत. 


जसे बल, गती, ध्वनी, गुरुत्वमध्य, प्रकाशाचे विकिरण. ही विज्ञान खेळणी परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या साधनातून कमी वेळेत, कमी श्रमात, कमी खर्चात तयार केली आहेत. यातून विज्ञानातील संकल्पना व अध्ययन निष्पत्ती सहज साध्य होतील. सदर साहित्याला शाळेतील व इतर विद्यार्थी, पालक शिक्षक  यांनी भरभरून प्रतिसाद दिला. साहित्य हे उपयोगी आहे व या प्रकारचे साहित्य आम्ही शाळेत तयार करून अध्यापनात वापर करू अशा प्रतिक्रिया शिक्षकांनी दिल्या. निवडीबद्दल जि.प.नंंदुुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, अक्कलकुवा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मंगेश निकुंभ, केंद्रप्रमुख के.डी.सूर्यवंशी, शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रातील सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)