औरंगाबाद येथे शिक्षिका सपना हिरे यांना बेस्ट टीचर नॅशनल अवॉर्ड ने सन्मानित

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदूरबार ( गोपाल गावित ) :

औरंगाबाद येथील विद्यार्थीप्रिय शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य ( औरंगाबाद) शब्दगंध समूह प्रकाशन,औरंगाबाद आम्रपाली प्रकाशन, बीड आयोजित बेस्ट टीचर नॅशनल अवॉर्ड साठी नंदुरबार जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षिका  सपना हिरे यांची निवड करण्यात आली. 


विविध जिल्ह्यातून निवड झालेल्या शिक्षकांपैकी नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा अंबापुर ता. जि.नंदुरबार येथील वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून कोरोना काळातील काम, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, उपस्थिती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान, वृक्षारोपण, सहशालेय उपक्रमाचे प्रभावी नियोजन, प्रवेशोत्सव, गावात सामाजिक क्षेत्रात सहभाग,  विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकवणे, सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना सोबत नेणाऱ्या उपक्रमशील तंत्रस्नेही  शिक्षिका सपना हिरे यांना औरंगाबाद येथे बेस्ट टीचर नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. 


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री रुपाली पवार, सुप्रसिद्ध कवी सुमित राठोड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संदीप त्रिभुवन व रमाताई त्रिभुवन यांनी केले होते.सूत्रसंचालन संदीप त्रिभुवन यांनी केले तसेच रमाताई त्रिभुवन यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)