कंधार येथे तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



लहान गटातून प्राथमिक शाळा चिंचोली तर मोठ्या गटातून प्राथमिक शाळा नारनाळी प्रथम !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य  मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकुर घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थांची शाळास्तर , केंद्रस्तर स्पर्धा घेवून केंद्रस्तरावरील विजेत्या विद्यार्थांची दि .३ ऑक्टोबर रोजी " तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा " कंधार येथील  कै वसंतराव नाईक सभागृह येथे घेण्यात आली .


या स्पर्धत तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्राथमिक शाळा चिंचोली केंद्र मंगलसांगवी येथील  लहान गट ( वर्ग 5 ते 7) यातून नैतिक माणिक राक्षसमारे , अनिरुद्ध बळवंत कौसल्ये , श्रीदास संदिप कौंसल्ये यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर मोठ्या गटातून वर्ग 8 वी 10 वी प्राथमिक शाळा नारनाळी केंद्र  गोणार येथील रंजना राजेंद्र रायवाडे , कृष्णा अर्जुन शेटवाड , संकेत लक्ष्मण देव्हारे यांना यश संपादन कले .


गटशिक्षणाधिकारी संजय येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रश्नमंजूषा कार्यक्रमाच्या आयोजनाची व यशस्वीतेची जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांनी पार पाडली .त्यानां हणमंत जोगपेटे , प्रदीप गित्ते,अंगद येनगे , सतिश भंडारे,अथर सरवरी , सौ मुक्ताई मोरताडे सर्व केंद्रप्रमुख उल्हास चव्हाण , एन.एम.वाघमारे माधव कांबळे,आनंद थोटे ,व गटसाधन केंद्रातील विषय साधनव्यक्ती,विशेष शिक्षक यांनी सहकार्य केले .


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय साधनव्यक्ती शिवकुमार कनोजवार यांनी केले . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. गंगाधर तोगरे , विश्वांबर बसवंते , दिगांबर वाघमारे , कैलास गरूडकर , मुनेश सिरशीकर आदींची उपस्थिती होती .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)