नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
शिक्षक संघाचे राष्ट्रीय नेते मा.संभाजीराव थोरात राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या आदेशान्वये शिक्षक नेते मा.जीवनराव वडजे पाटील यांच्या कडे लोहा तालुक्यातील केंद्रीय प्रा.शाळा गोलेगाव येथील उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक पोले पाराजी दादाराव यांची शिक्षक संघाच्या मराठवाडा विभागीय सरचिटणीसपदी नियुक्तीचे पत्र प्राप्त झाले होते.
पी.डी.पोले हे गेल्या तीस वर्षापासुन शिक्षक संघाचा एक निष्ठावंत मावळा म्हणून परिचित असून त्यांनी आजपर्यंत कंधार,लोहा तालुका पदाधिकारी तसेच जिल्हा सरचिटणीस म्हणून उल्लेखनीय कार्याची नोंद घेतली . दि.30/09/2022 जिल्हा शाखेच्या मासिक बैठकी मध्ये नियुक्तीचे पत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिक्षकांचे पंचप्राण संभाजीराव थोरात तात्या व राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांनी नांदेड जिल्हा शाखेला विभागीय सरचिटणीस पद दिल्या बदल जिल्हा शाखा व सर्व तालुका शाखेच्या वतीने अभिनंदन ठराव पास करण्यात आला.
तसेच भव्य स्वागत करण्यात आले आहे.त्यांच्या नियुक्तीचे पत्र नांदेड जिल्हातील शिक्षकांचे नेते मा.जीवनराव पाटील वडजे ,शिक्षक नेते संजय पाटील अंबुरे ,जिल्हाध्यक्ष दत्ताराम पाटील भोसले ,जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे ,जिल्हा कार्यध्यक्ष नरसिंग सोनटक्के ,जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रकांत गोविंदवार ,उद्धव पाटील सुर्यवंशी ,सुभाष हिंगोले ,विश्वेश्वर वडीले, शिवहार कल्लुरे ,गजानन उपरवाड ,लक्ष्मणराव अन्नकाडे, उमाकांत कोंडे, दयानंद ढवळे सर ,रेड्डी सर ,डी.बी.शेख ,केशगिरे एच.ई. ,ज्ञानोबा कोरडे ,दत्ता पाटील बोरकर वाघमारे बी.वाय. जिल्हा तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन जिल्हा शाखेच्या वतिने भव्य सत्कार करण्यात आला. पाराजी पोले यांची विभागीय सरचिटणीस पदी निवड झाल्याबदल जिल्हाभरातील सर्व शिक्षक कौतुक व अभिनंदन करत आहेत .
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .