शिक्षकांना विपश्यना शिबिरासाठी दहा दिवस On duty ; 'मैत्री' उपक्रम शाळेसाठी उपयुक्त | Vipassna : Mitra Upakram

शालेयवृत्त सेवा
0

 



विषय : राज्यातील सर्व प्राथमिक इयत्ता ५ वी ते १० / १२ वी च्या वर्गाकरीता मित्र उपक्रमांतर्गत आनापान साधना वर्ग राबविण्याबाबत.

संदर्भ : १) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०११ / (२९६ / ११) माशि - ३ दिनांक ०५ ऑक्टोबर २०११

२) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०११/(२९६ / ११) माशि - ३ दिनांक २७ जानेवारी २०१२

४ ) राज्य प्रकल्प संचालक, मप्राशिप, मुंबई यांच्या कार्यालयाचे पत्र क्र. २२२५ दिनांक १२ जून २०१४

५ ) संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण ), पुणे यांचे पत्र क्र. ३६०५ दिनांक ०५ ऑक्टोबर २०१७

६ ) दिनांक ०६ जुलै २०१९ राजी संपन्न झालेल्या कार्यशाळेचे इतिवृत्त E-mail: commissionereducation.mh@gmail.com Tel. No. 02026120141



◼️शिक्षण संचालनालय माध्यमिक च उच्च माध्यमिक विभाग यांचे पत्र क्र. ६६०१ दिनांक ११ जुलै २०१२ उपरोक्त संदर्भीय पत्रांनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता ५ वी ते १०/१२ वी च्या वर्गांकरीता मित्र उपक्रमातंर्गत आनापान साधना वर्ग सुरु करण्यात आलेला आहे. हा उपक्रम राबविणे सुलभ व्हावे यासाठी उक्त संदर्भीय पत्रांतील निर्देशानुसार पुढीलप्रमाणे यापूर्वीच निर्देश देण्यात आले आहेत.


◼️राज्य, जिल्हा, तालुका व शाळास्तरावर समितीचे गठन करुन त्यांच्या विविध कामांची विभागणी करण्यात आलेली आहे.

◼️शालेय स्तरावर करावयाच्या विविध बाबींची माहिती देण्यात आलेली आहे. यात मुख्यतः इयत्ता ५ वी ते १०/१२ च्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवशी शाळा सुरु होताना परिपाठाच्या नंतरचे १० मिनिटे आनापान साधनेचा सराव घेणे.



आनापान साधनेचे महत्व :

◼️आनापान साधना पद्धती ही विपश्यना साधना शिकण्याची पहिली पायरी आहे. बालपणी व पौगंडावस्थेत वाटणारी परीक्षेची चिंता, काळजी व ताणतणाव विद्यार्थी आनापान साधनेद्वारे अत्यंत आत्मविश्वासाने हाताळू शकतात. याद्वारे स्वत:च्या अंतर्मनामध्ये डोकावून मनाची पूर्ण एकाग्रता अनुभवतात. तिसऱ्या टप्यामध्ये आनापान साधनेद्वारे अनुभवलेली मनःशांती इतरांमध्ये प्रसारित करण्यासाठी मेत्ता भावना ( मैत्री भावना / सर्वांचे मंगल व्हावे ही प्रेरणा) अनुभवतात.


◼️आनापान साधनेच्या दैनंदिन सरावामुळे मुलांमध्ये एकाग्रता वाढते. मनाची जागरुकता व सतर्कता वाढते. स्वयंशासन वृद्धिंगत होते. स्मरण शक्ती वाढते, निर्णय क्षमता वाढते. आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. भीती, राग, चीड उदासिनता कमी होते. कार्यक्षमता वाढते. स्वयंशिस्त, अभ्यास, खेळ व अन्य क्रियाशीलतेमध्ये सहभाग वाढतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होतो. सदृढ मानसिकतेच्या पिढीच्या निर्मीतीसाठी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता ५ वी ते इयत्ता १०/१२ वी वर्ग असणाऱ्या शाळांमध्ये आनापान साधना वर्ग सुरु करण्यासाठी यापुर्वीच उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.


◼️शिक्षकांना शिकवताना व विद्यार्थ्यांना शिकताना आनंद व उत्साह वाटू लागतो. मन प्रसन्न, उत्साही आणि आनंदी राहते. कार्यक्षमता, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढते. मुलांची शिकण्याची गती वाढते, ताणतणाव थकवा कमी होतो. शारीरीक व मानसिक स्वास्थ सुधारते. परस्पर संबंध सुधारतात. आत्मियता व स्नेहभाव वाढतो. अशा प्रकारे या उपक्रमाचा शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सुद्धा लाभ होतो.


◼️या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका शिक्षकांचे १० दिवसाचे विपश्यना तसेच मित्र उपक्रमाचे १ दिवसाचे प्रशिक्षण उपयुक्त आहे. त्यानुषंगाने जवळपास १५,००० शिक्षकांनी मागील सात वर्षात हे प्रशिक्षण पूर्ण केले: असून ते आपल्या शाळेत हा उपक्रम राबवीत आहे.


◼️सर्व शाळांमध्ये १० दिवसांचे विपश्यना तसेच १ दिवसाचे मित्र उपक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केलेला एक शिक्षक उपलब्ध होण्यासाठी खूप कालावधी लागू शकतो. ही बाब विचारात घेऊन जिल्हा व तालुका स्तरावर प्रत्येक शाळेतील किमान एक शिक्षक प्राधान्याने मुख्याध्यापकास मित्र उपक्रमाचे ३ तासाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.


◼️शासन परिपत्रकातील सर्व सूचना विचारात घेऊन हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविणे सुलभ व्हावे. जेणेकरुन काळानुरूप या उपक्रमाच्या अंमलबजावणीत आलेली शिथीलता, काही ठिकाणी पडलेला खंड, बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेमुळे निर्माण झालेली आव्हाने सक्षमपणे पेलवता येतील. त्यानुषंगाने मित्र उपक्रमाची सातत्यपुर्ण अंमलबजावणी वर नमुद केल्याप्रमाणे सर्व शाळांमधुन सुरू राहण्यासाठी पुढिलप्रमाणे संक्षिप्त मार्गदर्शक सुचना पुनश्च निर्गमित करण्यात येत आहेत.


◼️सर्व शाळेतील प्राधान्याने या कामात पुढाकार घेऊन योगदान देऊ इच्छिणाऱ्या किमान एका शिक्षक/ मुख्याध्यापकाचे तीन तासाचे मित्र उपक्रमाचे प्रशिक्षण जिल्हा / तालुका स्तरावर जुलै / ऑगस्ट पूर्वी ज्यांनी १० दिवसाचे विपश्यना प्रशिक्षण पूर्ण केले आज अशा तज्ज्ञांकडून आयोजित करण्यात यावे किंवा विपश्यना संस्थेच्या मदतीने पूर्ण करून घ्यावे.


◼️मित्र उपक्रमाची विविध स्तरावरून प्रभावी अंमलबजावणी व योग्य समन्वय होण्याच्या दृष्टिने पुढिलप्रमाणे Nodal Officer काम करतील. 

 Website: www.education.maharashtra.gov.in 

पदनाम विभाग प्रमुख :

१ राज्य स्तर

२ जिल्हा विभाग प्रमुख

३ महानगरपालिका प्रशासन अधिकारी

४ तालुका

५ गट / शहर साधन केंद्र समन्वयक

६ कार्यालय

७ समता विभाग, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, (विद्या प्राधिकरण ), पुणे.


◼️वरील संदर्भीय पत्रातील मार्गदर्शक सूचनांनुसार मित्र उपक्रमाची सर्व शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक ते निर्देश सर्व संबंधितांना देऊन या कार्यक्रमाची समन्वय करण्याची जबाबदारी Nodal Officer यांची राहणार आहे.

समता विभाग, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण

व्यावसायिक विकास संस्था

शिक्षण विभाग, महानगरपालिका

गटशिक्षणाधिकारी / समन्वयक


◼️शासनाकडून शिक्षक व अधिकाऱ्यांसाठी विविध पातळीवर शिक्षण परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षणे, परिसंवाद, चर्चासत्र बैठका, व्हिडीओ कॉन्फरन्सेस इत्यादींचे आयोजन करण्यात येते. यामध्ये उपलब्ध वेळेनुसार दोन / तीन तासांचा वेळ मित्र उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टिने उपस्थितांना प्रत्यक्ष अनुभवातून उपलब्धीची जाणीव निर्माण होण्यासाठी प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी २ तासांचा वेळ उद्बोधनाकरीता आणि प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षण सुरुहोण्यापूर्वी व प्रशिक्षणानंतर १० - १० मिनिटांचा वेळ साधनेच्या सरावासाठी देण्यात यावा.


◼️शैक्षणिक विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी शिक्षकांकरीता दरमहा समूह साधन केंद्र स्तरावर शिक्षण परिषदेचे आयोजन केले जाते. आनापान साधनेचे महत्व व मित्र उपक्रमाचे सविस्तर ज्ञान शिक्षकांना अवगत झाल्यास ते मुलांचा या साधनेचा सराव नियमित व योग्य पद्धतीने घेऊ शकतील. त्यासाठी माहे जुलै/ ऑगस्टच्या शिक्षण परिषदेचा ३ तासांचा वेळ याकामी उपलब्ध करून देण्यात यावा. या कार्यात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शिक्षकांनी यापुर्वी विपश्यनेचा १२ दिवसांचे प्रशिक्षण कोर्स पुर्ण केला आहे त्यांची मदत घेण्यात यावी.


◼️पालक व समाज यांनीही मित्र उपक्रमाची व्याप्ती व उपयोगिता समजण्याच्या दृष्टिने व त्यांनाही सजगता यावी यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत त्यांचेही २-३ तासांचे उद्बोधन वर नमुद केलेल्या तज्ज्ञ शिक्षकांकरवी करण्यात यावे. जेणेकरुन शाळा, घर, परिसरामध्ये आनापान साधनेचे महत्व रुजण्यास मदत होईल.


◼️मित्र उपक्रमाच्या अंमलबजावणीत सातत्य टिकून राहण्याच्या दृष्टिने जिल्हा / तालुका स्तरावरील गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत त्याचा आढावा घेण्यात यावा. शाळा भेटी दरम्यान सदर उपक्रम अखंडपणे सुरु असून त्याचा शिक्षक व विद्यार्थ्यांना लाभ होत असल्याची खातरजमा करावी.


◼️मित्र उपक्रमाची नियमितपणे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या उपक्रमाचे खोलात जाऊन ज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व शिक्षक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील घटकांना १२ दिवसाचा विपश्यना प्रशिक्षण कोर्स करणे अगत्याचे आहे. उपलब्ध कालावधी व स्त्रोत विचारात घेऊन एकाच वेळी सर्व शिक्षकांना सदर कोर्स करणे जटील होणार आहे त्यामुळे टप्याटप्याने सदरचा कोर्स शिक्षक व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देता येईल. यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्थेकडुन ऑनलाईन प्रपत्र सदर कोर्सच्या नोंदणीसाठी इच्छुकांकडुन भरुन घेता येईल. 


◼️ऑनलाईन नोंदणी केलेल्या शिक्षक / पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांची संकलित माहितीची पडताळणी करुन लगतच्या विपश्यना केंद्राशी संपर्क साधून उपलब्ध होणाऱ्या जागांची संख्या विचारात घेऊन १२ दिवसांच्या विपश्यना प्रशिक्षणासाठीची यादी अंतिम करावी. यामध्ये निवड झालेल्या शिक्षक व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांना सदर प्रशिक्षणास on duty उपस्थित कार्यमुक्त करावे.


◼️ज्या शिक्षक / मुख्याध्यापक / पर्यवेक्षीय अधिकारी यांनी १२ दिवसाचा विपश्यना कोर्स पूर्ण केला आहे, त्यांनी शाळेतील अन्य शिक्षक / मुख्याध्यापक सहकाऱ्यांचे अंदाजे ३ तासाचे प्रशिक्षण पूर्ण करुन घ्यावे.


◼️शाळेतील इयत्ता ५ वी ते १० / १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रात १ ॥ तासाचे आनापान साधनेचे व वेळेच्या उपलब्धतेनुसार सदरचे प्रशिक्षण वेळोवेळी देण्यात यावे. प्रशिक्षण द्यावे. 


◼️साधनेचा आवश्यकता परिपूर्ण लाभ मिळण्यासाठी शाळा सुरु होताना व संपताना किमान प्रत्येकी १०-१० आनापान मिनिटांचा सराव पूर्व ध्वनीमुद्रीत सूचनांच्या आधारे (Audio clip) इंग्रजी / मराठी / शक्यतो हिंदी भाषेत घेणे आवश्यक आहे. तोंडी सुचना देऊन सराव कधीच घेऊ नये. तसेच काही शाळांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे इतका वेळ देणे शक्य होत नसल्यास किमान १० मिनिटाचा सराव करून घेण्यात यावा. होण्याच्या दृष्टिने सातत्यपूर्ण सुरु सदरचे कार्य समाजबांधणी, आपले सहकार्य व सहभाग.


◼️आनापान साधनेचा शाळेमध्ये नियमित सराव करण्यासाठी पहिल्या तासिकेमधील ५ मिनिटे व मधल्या दीर्घ सुट्टीमधील असा एकूण १० मिनिटांचा वेळ कमी करुन सदर १० मिनिटाचा वेळ आनापान ५ मिनिटे साधनेसाठी शालेय वेळापत्रकात उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार सदर १० मिनिटे परिपाठानंतर लगेचच आनापान साधनेसाठी उपयोगात आणावीत.


◼️मित्र उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पूरक साहित्य व व्हिडीओज www.mitraupkram.net या संकेतस्थळावर (website) किंवा mobile app - Google Play Store Mitra Upkram Pune Vipassana Samiti मित्र किंवा www.mitraupkram_training.jsp वरुन Downlod करता येतील.


त्यानुसार प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी वरील परिपत्रकातील सर्व सूचना विचारात घेऊन परिपत्रकाची सर्व शाळांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करावी. तसेच हा उपक्रम सदर प्रत राहील यासाठी त्याच्या अंमलबजावणीचा आढावा व पाठपुरावा पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत करण्यात यावा. सदृढ व सक्षम राष्ट्रनिर्मितीसाठी महत्वाचे योगदान देणारे असल्याने या कार्यात अत्यंत मोलाचा ठरणार आहे.


विपश्यना शिबीरासाठी येथे online नोंदणी करू शकता



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)