शिक्षकांना संशोधन प्रकल्पासाठी आर्थिक साह्य..

शालेयवृत्त सेवा
0

 



निवेदन

संशोधन प्रकल्प आर्थिक साह्य योजना पाठ्यपुस्तक मंडळाच्या संशोधन प्रकल्प आर्थिक साह्य योजनेअंतर्गत सन २०२२-२३ या संशोधन कार्यक्रमाची निश्चिती करण्यात आलेली आहे. संशोधन प्रकल्प विषय प्रामुख्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके यावर आधारित आहेत.


संशोधन प्रकल्प प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविदयालयीन शिक्षक, तसेच शिक्षक प्रशिक्षक यांना घेता येतील. वैयक्तिक स्तरावरील प्रकल्पाचा कालावधी एक वर्षाचा असेल. वैयक्तिकस्तरावरील प्रकल्पासाठी किमान रू.५,०००/- आर्थिक साह्य देण्यात येईल. प्रकल्प समाधानकारकरीत्यापूर्ण केल्यानंतर प्रकल्पकांना व स्थानिक मार्गदर्शकांना पाठ्यपुस्तक मंडळाच्या नियमाप्रमाणे मानधन देण्यातयेईल.


पाठ्यपुस्तक मंडळाने सन २०२२-२३ संशोधन कार्यक्रमाची निश्चिती केलेली आहे. पाठ्यपुस्तकमंडळाच्या संशोधन प्रकल्प आर्थिक साह्य योजनेनुसार संशोधन प्रकल्प घ्यावयाचे असतील, तर त्यासाठी संशोधन प्रकल्प आर्थिक साह्य योजना नियमावली, आवेदनपत्राचा नमुना व संशोधन विषयwww.ebalbharati.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर आवेदनपत्र डाऊनलोड करून घ्यावे.डाऊनलोड केलेले आवेदनपत्र भरून या कार्यालयास पाठवण्याचा अंतिम दिनांक ३१.१०.२०२२ आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)