शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना बॅक डेटेड माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
उपरोक्त विषयान्वये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमार्फत दैनंदिन आहार घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या उपस्थितीची माहिती एमडीएम पोर्टलवर मोबाईल अॅप व वेबपोर्टलच्या माध्यमातून अद्यावत करण्यात येते. शाळांनी ऑनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारे इंधन-भाजीपाला तसेच धान्यादी मालाची देयके जनरेट करण्यात येऊन शाळांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येत आहे.
कोविड-१९ साथीच्या प्रादूर्भावामुळे मागील दोन वर्षापासून शाळांचे ऑनलाईन उपस्थितीची माहिती भरण्याचे काम बंद असणे तसेच दरम्यानच्या कालावधीमध्ये कोरड्या स्वरुपातील धान्यादी मालाचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आल्यामुळे ऑनलाईन उपस्थिती नोंदविण्यात आलेली नाही. माहे मार्च २०२२ पासून शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तथापि अनेक शाळांचे अॅप अद्यावत नसणे, शिक्षकांची नोंदणी नसणे किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे दैनंदिन उपस्थितीची माहिती भरण्याचे प्रलंबित असल्याची निवेदने संचालनायास प्राप्त झाली आहेत.
उक्त बाबत सर्व जिल्ह्यांना सूचित करण्यात येते की, शाळांना मागिल कालावधीची (माहे मार्च, २०२२ ते सप्टेंबर, २०२२ अखेर) दैनदिन प्रलंबित उपस्थिती भरण्याकरीता केंद्र प्रमुख तथा तालुका लॉगिनवर दि. २८.०९.२०२२ ते ०४.१०.२०२२ या दरम्यान सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदरच्या कालावधित आपल्या जिल्ह्यातील काही शाळांची दैनंदिन उपस्थिती भरण्याची प्रलंबित असल्यास, अद्यावत करुन घेण्यात यावी. तद्नंतर तसेच संचालनालयस्तरावरुन देयके जनरेट करण्यात आल्यानंतर अशा प्रकारची कोणतीही सुविधा शाळांना उपलब्ध करुन देण्यात येणार नसलेबाबत शाळांना अवगत करुन देण्यात यावे. तसेच शालेय पोषण आहार योजनेस पात्र सर्व शाळा एमडीएम पोर्टलवर उपस्थितीची माहिती अद्यावत करीत असलेबाबत नियमितपणे आढावा घेण्यात यावा.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .