किनवट- माहूर या अनुसूचित क्षेत्रातील शाळा कायम ठेवा - आमदार भीमराव केराम यांची मागणी

शालेयवृत्त सेवा
0



नांदेड (शालेय वृत्तसेवा) :

जिल्ह्यातील किनवट आणि माहूर या अनुसूचित क्षेत्रातील शाळा बंद न करता त्या सुरूच ठेवाव्यात यासाठी आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनातून नुकतीच मागणी केली असून आदिवासी बहुल भाग असलेला किनवट व माहूर तालुक्यातील 93 शाळांना कायम सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. 



राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी नुकतेच लेखी निवेदन देऊन अनुसूचित क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा कायम ठेवणे बाबत मागणी केली आहे. दरम्यान संचालक (शिक्षण) पुणे यांनी 1 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या संबंधाने धोरणात्मक निर्णय घेतला असल्याने किनवट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 71 शाळा व माहूर तालुक्यातील 22 अशा एकूण 93 शाळा बंद होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सदरची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)