नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे मागील अनेक वर्षापासून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शाळेतील विद्यार्थ्यांना अध्यापन करत आहेत करत आहेत तसेच शाळेच्या नावाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा असे शाळेचे यूट्यूब चैनल सुद्धा सुरू केले असून यावर सातत्याने शाळेत राबवण्यात जाणाऱ्या उपक्रमाची नोंद केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांत सर्जनशीलता, कल्पनाशक्तीचा विस्तार, समाधीटपणा स्वतःचे विचार व्यक्त करण्याची क्षमता अध्यापनाचा वापर प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात कसा करावा याचे ज्ञान, कारक कौशल्यांचा विकास आदी बाबींचा विकास विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे.
यातच यावर्षी पहिल्यांदाच खेळू करू शिकू ही वर्ग पाचवी साठी पुस्तिका आली असून यात कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण या विषयाचा समावेश आहे यातील शिक्षक रवी ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली फेकणे, मानवी मनोरे याबाबत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपक्रमाची नोंद समग्र शिक्षा अभियान यांनी नुकतीच घेऊन विद्यार्थ्यांमधील कारक कौशल्य विकसित करण्यासाठी, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्याकरिता खेळातून शिक्षण हा उत्तम पर्याय म्हणूनच खेळू करू शिकू या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश या सदराखाली हा उपक्रम समग्र शिक्षा अभियानाच्या फेसबुक ट्विटर youtube या समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आला आहे यात प्रामुख्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शाळांच्या उपक्रमाला संधी दिली जाते. पहिल्यांदाच मराठवाड्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा शाळेस संधी मिळाल्याचे उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी सांगितले.
याबद्दल त्यांचे शिक्षण अधिकारी सौ सविता बिरगे मॅडम गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णकुमार फटाले केंद्रप्रमुख टी पी पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदा ढेपे शिक्षण तज्ञ भास्कर पाटील ढगे , शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट मुगावे यांनी त्यांचे व मुलांचे अभिनंदन केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .