जीवनात मोठ्यांनी लहानांना सोबत घेऊन चालावे : शिवाजी आंबुलगेकर

शालेयवृत्त सेवा
0

 



प्रश्नमंजुषा स्पर्धा:केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा प्रथम 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी तयार असायला हवे. मोठ्यांनी लहानांना सोबत घेऊन चालावे. एक ते नऊ व शून्य अंकांची गोष्ट ही, लहान अंक एक व शून्य एकत्र आल्यास मोठा अंक तयार होतो. जीवनात सुध्दा मोठ्यांनी लहानांना सोबत घेऊन चालावे. जीवन खुप सुंदर होईल. असे प्रतिपादन साहित्यिक शिवाजी आंबुलगेकर यांनी केले.


अर्धापूर पंचायत समिती शिक्षण विभागाकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळगाव (म) येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रारंभी गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी प्रास्ताविक केले.


उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांनी पुष्प व पुस्तक भेट देऊन केले.   स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित स्पर्धेत केंद्रस्तरीय स्पर्धेतून विजेते होऊन आल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत इयत्ता ५ ते ७ गटात कें.प्रा.शा.कामठा शाळेने प्रथम क्रमांक मिळवला. यात कु. शिवानी शिनगारे, नैतिक आबादार व कु. जान्हवी कांबळे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. तर इयत्ता ८ ते १० वी यागटातून पिंपळगाव (म) केंद्रातील जि.प.हायस्कूल पिंपळगाव (म) च्या कु.काजल दुधमल, कु.राणी शिरडे व कु. संजना कल्याणकार या विद्यार्थ्यांनींच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला. 


तालुकास्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेचे नियोजन शिक्षण विस्तार अधिकारी श्री गजानन सोनटक्के व श्री गोडबोले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव दादजवार यांनी केले. स्पर्धेचे संचालन सौ. ऊषा नळगीरे व साहेबराव कांबळे यांनी केले. केंद्रप्रमुख विनोद देशमुख, विकास चव्हाण, विषयतज्ञ शेख रज्जाक, पाईकराव, अंकुश वारे यांनी स्पर्धा आयोजनासाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)