प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची झाली सुरवात.. | Intra-district transfers of teachers

शालेयवृत्त सेवा
0


५ जानेवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल !


मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन आजपासून बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया ५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतरच संबंधित शिक्षकांना त्यांचे गाव मिळणार आहे. शैक्षणिक सत्र अर्धे संपले असतानाच आता ही बदली प्रक्रिया राबविली जाणार असल्याने काही शिक्षकांमध्ये संतापाचे, तर बदलीस इच्छुक शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षामध्ये बहुतांश शाळा बंद होत्या. त्यावेळी ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्यात आला. यावर्षीपासून नियमित शाळा सुरु झाल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांची उजळणी करून पुढील शैक्षणिक सत्राची सुरुवात करण्यात आली. मात्र आता उद्या (दि.१ नोव्हेंबर) जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबिवण्यात येणार आहे. 


विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच काही शिक्षकांची पदोन्नतीने उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून बढती झाली आहे. शैक्षणिक सत्राच्या मध्येच शिक्षकांची बदली होणार असल्याने सध्या स्थितीत धाकधूक वाढली आहे. त्यातच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचीही शक्यताही आहे.




वेळापत्रक : जि प शिक्षक जिल्हाअंतर्गत बदली  2022 (शासन परिपत्रकनुसार )


◼️विशेष संवर्ग भाग 1 व 2 साठी फॉर्म भरणे. दि.5/11/2022 ते 7/11/2022


◼️विशेष संवर्ग भाग 1 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.24/11/2022 ते 26/11/2022 (3 दिवस)


◼️विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.01/12/2022 ते 03/12/2022 (3 दिवस)


◼️बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.08/12/2022 ते 10/12/2022 (3 दिवस)


◼️बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.15/12/2022 ते 17/12/2022 (3 दिवस)


◼️विस्थापित शिक्षकांच्या राऊंडसाठी पर्याय भरणे. दि.22/12/2022 ते 24/12/2022 (3 दिवस)*


◼️अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे. दि. 30/12/2022 ते 01/01/2023 (3 दिवस)


◼️बदलीचे आदेश प्रकाशित करणे. दि. 05/01/2023 ते 05/01/2023 (1 दिवस)

टीप:जिल्हांतर्गत बदली पोर्टल सुरू झालेले आहे.सध्या केवळ CEO , EO आणि BEO लॉगिन सुरू झाले आहे.त्यांचे काम  4 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील. 5 नोव्हेंबर पासून शिक्षक लॉगिन सुरू होईल....

                         

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)