जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या सुधारित धोरण | Inter district transfers

शालेयवृत्त सेवा
0

 



जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भ क्र.१ येथील दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून, २०२२ पर्यंत करण्यास संदर्भ क्र.२ येथील दिनांक ४.५.२०२२ च्या शासन निर्णयान्वये तरतुद करण्यात आली आहे. 


सन २०२२ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भ क्र.३ येथील दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कालावधीनुसार बदल्यांबाबतची कार्यवाही संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.


 उक्त दिनांक ४.५.२०२२ व दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयानुसार होणारी कार्यवाही फक्त सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिताच लागू राहील. आता ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)