पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांना सरल डेटाबेस वरून ऑनलाईन पद्धतीने नियमित शुल्काने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आले आहे आता या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज पाच नंबर पर्यंत भरता येणार आहेत राज्य शिक्षण मंडळाचे बारावीचे परीक्षा देव इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे संकेतस्थळावर अर्ज भरण्याची कारवाई सध्या सुरू आहे.
तसेच व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय आयटीआय चे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेचा अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे नियमित विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 21 ऑक्टोबर रोजी संपत आहे.
शुल्क भरण्याच्या तारकाही जाहीर :
ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर बँकेत शुल्क भरण्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व फ्री लिस्ट जमा करावयाच्या कालावधीही राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे शुल्क भरण्यासाठी 19 ऑक्टोंबर ते नऊ नंबर पर्यंत मुदत आहे शुल्क आरटीजीएस एनईएफटी द्वारे भरल्याची पावती व चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्यासाठी शाळा कॉलेजांना 11 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिल्याचे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी नमूद केले आहे
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .