शाळांना दिवाळीची १८ दिवस सुट्टी २० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर पर्यंत शाळा राहणार बंद

शालेयवृत्त सेवा
0

 



पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

दिवाळीची सुरुवात 21 ऑक्टोबर पासून होत आहे त्या निमित्ताने शाळा शिक्षक व विद्यार्थ्यांना 20 ऑक्टोबर ते 8 नोवेंबर पर्यंत सुट्टी असणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीची सुट्टी राहील त्यामुळे 9 नोव्हेंबर पासून शाळा पुरवत सुरू होतील.


दिवाळीच्या निमित्ताने यंदा अठरा दिवस शाळा बंद राहतील कोरोनामुळे शाळा दोन वर्षापासून बंद राहिल्याने दिवाळी सुट्टीत देखील विद्यार्थ्यांवर शिक्षकांचा तास असणार आहे. पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना अंकगणित अक्षर ओळख व्हावी हा त्यामधील हेतू असणार आहे. दोन वर्ष शाळा बंद राहिल्याने असंख्य विद्यार्थी अभ्यासात अजूनही पिछाडीवर आहेत ऑनलाईन शिक्षण घेता न आलेल्यांना विशेषता सर्वसामान्य कुटुंबातील मुलांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जात आहे. दिवाळी सुट्टीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयावर निबंध लिहिणे वाचन सराव अंक व अक्षर ओळख याकडे लक्ष द्यायचे आहे. शिक्षकांना त्याची सक्ती नाही पण स्वच्छने शिक्षकाने ते काम करायचे आहे.

( टिप - स्थानिक जिल्हा परिषदेच्यावतीने जाहीर केलेल्या सुट्या गृहीत धरून | जसे नांदेड १७ ऑक्टोबर | यवतमाळ 21 ऑक्टोंबर.. )


महाविद्यालयाच्या सत्र परीक्षा 4 नोव्हेंबर पासून कॉलेजमध्ये पदवी स्तरावरील आणि जुनियर कॉलेजच्या सत्र परीक्षा या 4 नोव्हेंबर पासून होण्याची शक्यता आहे. तर 20 ऑक्टोबर पासून सुट्ट्या लागतील ते 4 नोव्हेंबर पासून पुन्हा कॉलेजमध्ये नियमित सुरू होणार असल्याचे समजले. तसेच विद्यापीठांतर्गत असलेल्या विभागांना 20 सप्टेंबर ते 4 नोव्हेबर पर्यंत सुट्ट्या असणार आहेत. 



दिवाळीपूर्वी जिल्हा अंतर्गत बदली 

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली आठ दहा दिवसात होणार आहेत एका शाळेवर पाच वर्षे सेवा बजावलेल्या शिक्षकांची दुसऱ्या शाळेत बदली होणार आहे. त्यासाठी त्यांना 20 शाळांचे पर्याय द्यायचे आहेत. ज्या तालुक्यात शिक्षक कमी त्या ठिकाणीच काही शिक्षकांची बदली होऊ शकते.



दिवाळीपूर्वी होणार वेतन 

दिवाळीनिमित्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा प्रत्येकी साडेबारा ते पंधरा हजाराचा आग्रीम मिळेल. शिक्षकासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर शेवटी वेतन मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)