जि.प. शाळा उभरांडी येथे विधानसभेच्या आमदार मा.मंजुळाताई गावीत यांच्या हस्ते वॉटर फिल्टर मशीन, एलईडी टीव्ही, सीसीटीव्ही मॉनिटर स्क्रीनचे भव्यदिव्य लोकार्पण सोहळा संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 




   

धुळे (शालेय वृत्तसेवा)  :

धुळे जिल्हा परिषद अंतर्गत साक्री तालुक्यातील डिजिटल तथा उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्हा परिषद शाळा उभरांडी येथे निजामपूर गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कै.बाबूलाल बंडू वाणी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते श्री भूषण बाबुलाल वाणी तथा त्यांच्या धर्मपत्नी निजामपूर गावाच्या सरपंच श्रीमती सोनाली भूषण वाणी यांच्या कडून शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे एक लाख रुपयांचे वॉटर फिल्टर मशीन प्राप्त झाले, तथा कै.शोभाताई धर्मराज चिंचोले यांच्या स्मरणार्थ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री धर्मराज काशिनाथ चिंचोले यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५० इंच स्मार्ट एलईडी टीव्ही संच प्राप्त झाले आणि कै. मंगा अर्जुन मुजगे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र माजी पंचायत समिती सदस्य श्री अशोक मंगा मुजगे व त्यांच्या धर्मपत्नी, जैताणे गावाचे सरपंच श्रीमती कविता अशोक मुजगे यांच्याकडून सीसीटीव्ही प्रणालीसाठी एलईडी स्क्रीन सेट प्राप्त झाले. 


शाळेला सर्व प्राप्त वस्तूंचा लोकार्पण सोहळा साक्री तालुका विधानसभेच्या आमदार मंजुळाताई तुळशीराम गावीत, धुळे जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती  मंगलाताई सुरेश पाटील, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपा प्रांतिक सदस्य श्री सुरेश रामराव पाटील, धुळे जिल्हा नियोजन मंडळ समितीचे सदस्य दादासो डॉ.श्री तुळशीराम गावीत यांच्या शुभहस्ते फित कापून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री तालुका विधानसभेच्या आमदार मंजुळाताई तुळशीराम गावीत ह्या विराजमान होत्या. 


कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी पदी व्यासपीठावर धुळे जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती ताईसो मंगलाताई सुरेश पाटील, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपा प्रांतिक सदस्य आबासो श्री सुरेश रामराव पाटील, धुळे जिल्हा नियोजन मंडळ समितीचे सदस्य दादासो डॉ. तुळशीराम गावीत, जि प सदस्य श्री गोकुळ परदेशी, सामाजिक कार्यकर्ते श्री भूषण बाबुलाल वाणी, माजी पंचायत समिती सदस्य श्री अशोक मंगा मूजगे, साक्री नगरपंचायतीचे नगरसेवक श्री सुमित नागरे, निजामपूर गावाच्या सरपंच श्रीमती सोनाली भूषण वाणी, जैताणे गावाच्या सरपंच श्रीमती कविता अशोक मुजगे, निजामपूर ग्रामपालिका सदस्या श्रीमती पुष्पांजली प्रकाश बच्छाव, धुळे व नंदुरबार जिल्हा ग स बँकेचे गटनेते न्हानभाऊ श्री रवींद्र खैरनार, साक्री तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री राजेंद्र पगारे , धुळे व नंदुरबार ग स बँकेचे चेअरमन श्री प्रवीण भदाणे , धुळे व नंदुरबार जिल्हा ग स बँकेचे व्हा.चेअरमन श्री बबन नगराळे, धुळे व नंदुरबार जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्री शिवानंद बैसाणे, दुसाणे बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री विजय पवार, केंद्रप्रमुख श्री धनराज मुजगे, साक्री तालुका समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष श्री विनोद खैरनार, ग स बँकेचे संचालक श्री संदीप मराठे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री गायकवाड साहेब, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री शेवाळे साहेब, ज्येष्ट पत्रकार श्री मधूकर खारकर, निजामपूर ग्रामपालिका सदस्य श्री परेश पाटील, उभरांडी गावाचे सरपंच श्री नारायण सावळे इ. मान्यवर विराजमान होते. कार्यक्रमाच्या उद्घाटक धुळे जिल्हा परिषदेच्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस  ह्या महत्वाच्या मीटिंग साठी व्यस्त असल्या कारणाने उपस्थित राहू शकल्या नाहीत . कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. 




शाळेतर्फे कार्यक्रमाचे अध्यक्ष, अतिथी आणि दात्यांचा गुलाबपुष्प, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम दरम्यान मनोगत व्यक्त करतांना ग स बँकेचे गटनेते न्हानभाऊ श्री रवींद्र खैरनार यांनी शाळेच्या लोकवर्गणीतून केलेल्या कामांचे कौतुक केले, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री राजेंद्र पगारे यांनी शाळेच्या गुणवत्तेविषयी प्रशंसा करत शाळेला शुभेच्छा दिल्या, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपा प्रांतिक सदस्य श्री सुरेश रामराव पाटील यांनी मनोगतात सांगितले की तालुक्यातील शिक्षक हे अतिशय मेहनती असून सर्वांगीण प्रगतीसाठी झटत असतात. 


साक्री तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका असून शाळेतली विविध विकास कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात आमदार मंजुळाताई गावीत यांनी शाळेची गुणवत्ता, शाळेचे आल्हाददायक वातावरण , शाळेच्या लोकवर्गणीतून प्राप्त झालेल्या भौतिक सुविधा, विविध भव्यदिव्य कामांबद्दल  आनंद व्यक्त करत शाळेतील शिक्षक श्री प्रकाश बच्छाव सर, मुख्याध्यापक श्री सदाशिव पाटील सर आणि सर्व स्टाफ चे कौतुक केले. त्यांनी उभरांडी गावात लोकांना पिण्यासाठी योग्य नसलेले क्षारयुक्त पाण्याबाबत समस्या समजून घेत आपल्या भाषणात प्रतिपादित केले की मी आता स्वतः ह्या समस्येबाबत लक्ष देत लवकरात लवकर शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जल मिशन अंतर्गत मोठा निधी मिळवून देऊन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन दिले. 


तथापि गावासाठी आपल्या विकास कामांच्या निधीतून सुमारे १० लाख रुपयांचे मोठे वॉटर फिल्टर मशीन प्राप्त करून देण्याचे वचन ही त्यांनी आपल्या मनोगतात दिले. शाळेला इमारत बांधकाम साठी संपूर्णतः सहकार्य करण्याचे आश्वासन देत मनोगत दरम्यान त्यांनी उभरांडी शाळेचा चेहरामोहरा बदलविणारे शिक्षक ग स बँकेचे संचालक तथा नंदूरबार जिल्हा विभागीय चेअरमन श्री प्रकाश बच्छाव सर यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दुसाणे बिटाच्या शिक्षण परिषदेचे दुसऱ्या सत्राचे आयोजन भोजनानंतर करण्यात आले. शिक्षण परिषदेत अध्ययन निष्पत्ती बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री विजय न्याहळदे यांनी तर प्रास्ताविक श्रीमती कावेरी वामन सोनवणे यांनी केले. आभार श्री प्रकाश बच्छाव सर यांनी व्यक्त केले . 


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक श्री सदाशिव पाटील, शिक्षक श्री प्रकाश बच्छाव , श्री सुनिल जाधव , श्री वसंत तोरवणे , श्रीमती कावेरी सोनवणे , श्री विजय न्याहळदे, श्री प्रभाकर वाघ, सरपंच श्री नारायण सावळे, ग्रामसेवक श्री शिंदे भाऊसाहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष सावळे,श्री पावबा बच्छाव,श्री किशोर वाघ, श्री अकबर पिंजारी, श्री ज्ञानेश्वर कंखर, श्री रामचंद्र भलकारे, उपसरपंच श्री राजू वाघ, श्री सुभाष सावळे, श्री चैत्राम सावळे, श्री चतुर वाघ, श्री चूनीलाल धानोरे, श्री दिनेश शेलार, श्री लोटण सावळे, श्री ईश्वर सावळे,श्री शांतीलाल शेलार, श्री रुपचंद अहिरे, श्री मुरलीधर जगताप, श्रीमती सरला पाटील, श्रीमती मनीषा शेलार, श्रीमती रमिला पवार,श्री योगेश वाघ, श्री योगेश सावळे, श्री सुरेश सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष व सर्व सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, इत्यादी ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)