तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत मधुमती गलांडे प्रथम

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्य मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकुर-घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थांची शाळास्तर, केंद्रस्तर स्पर्धा घेवून केंद्रस्तरावरील विजेत्या विद्यार्थांची दि. ३ ऑक्टोबर रोजी धर्माबाद " तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा " धर्माबाद येथील गटसाधन केंद्रातील सभागृहात घेण्यात आली .


या तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत तालुक्यातील चार केंद्रातील एकूण 13 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. इयत्ता पाचवी ते सातवी या प्राथमिक गटातून कन्या शाळा धर्माबाद येथील येथील विद्यार्थिनी कु. मधुमती गलांडे हिने प्रथम क्रमांकांचे यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रविशंकर मरकंटे, केंद्रप्रमुख आबासाहेब उस्केलवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सुजाता सोनकांबळे, उपाध्यक्ष लक्ष्मण बापूराव जगदंबे, पत्रकार भगवान कांबळे, नगरसेवक रमेश पाटील बाळापूरकर, सौ. विद्या निर्वाण वाघमारे, श्रीमती मंगल कस्तुरे, कन्हैय्या मंतोड, व्यंकटेश बेंडके, विनोद धुर्वे, इब्राहिम शेख, प्रभारी मुख्याध्यापक सौ. चंदा सय्यद, विषय शिक्षक नासा येवतीकर, सौ. मनिषा जोशी, श्रीमती सुमित्रा खेडकर, एजाज सय्यद आणि माधव हिमगिरे आदींनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)