शाळा बंद करणे म्हणजे वाडी, तांड्यावरची लेकरं शिक्षणापासून वंचित ठेवणं !

शालेयवृत्त सेवा
0

 


बहुजन शिक्षक महासंघ राज्यभर आंदोलन उभारणार !


लातूर ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र राज्यातील 0 ते 20 विद्यार्थी असलेल्या वाडी, तांड्यावरच्या शाळा बंद करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय 21 व्या शतकातील अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. जग 5G च्या दिशेने जात असताना वाडी तांड्यावरची लेकरं मात्र शाळेपासून वंचित ठेवण्याचा घाट सरकार घालत आहे. एकीकडे शिक्षणमंत्री 5G Technology च्या माध्यमातून शहरांतल्या विद्यार्थ्यांना संवाद साधतात तर दुसरीकडे बहुजनांची लेकरं शिक्षणापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतात. सरकारच्या अशा निर्णयाविरुद्ध बहुजन शिक्षक महासंघ राज्यभर आंदोलन उभारणार आहे.

     

महासंघाचे राज्याध्यक्ष मा. गौतमजी टाकळीकर,  यांनी शासनास या संदर्भात निवेदन दिलेले आहे. निवेदनाचा विचार करून अशा प्रकारचा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हक्कांपासून वंचित ठेवणारा दुर्दैवी निर्णय सरकारने मागे घ्यावा व जिल्हा परिषदेच्या शाळांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून पटसंख्या वाढीच्या दृष्टीने उपाय योजना कराव्यात. व खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या विचारातील महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने वाटचाल करावी. तरच महाराष्ट्र प्रगतीपथावर मार्गक्रमण करू शकेल अन्यथा गावकुसाबाहेरची वाडी-तांड्यावरची लेकरं शिक्षणापासून वंचितच राहणार.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)