२० ऑक्टोंबर पर्यंत माहिती होणार संकलित !
उपरोक्त विषयानुषंगाने आपणास कळविण्यात येते की, नांदेड जिल्हा परीषद शिक्षण विभाग प्रा अंतर्गत १८ केंद्रप्रमुख संवर्गीय पदोन्नती कोटयातील रिक्तपदे भरावयाची आहेत. सदर पदे भरणेबाबत शासनाने संदर्भीय पत्रानुसार सर्व जिल्हा परीषदांना पदोन्नती कोटयातील रिक्तपदे भरण्याकरिता निर्देश दिले आहेत.
• नांदेड जिल्हयातील खालील अर्हतायोग्य व निकषपात्र प्राथमिक शिक्षक/ पदवीधर शिक्षक/ उच्चश्रेणी मुख्याध्यापक या संवर्गातील कर्मचा-यांची माहिती सोबत दिलेल्या विहीत नमुन्यात मागविण्यात येत आहे.
अर्हता-/निकष व पदोन्नती प्रक्रिया-
1. ज्यांनी संबंधित विषयामध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान ५० टक्के गुणासह पदवी धारण केली असेल, आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड अथवा समकक्ष पदवी धारण केली असेल.
2. एकूण मान्य पदापैकी ३० टक्के पदे जिल्हा परीषदेच्या प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक पदावर किमान ३ वर्षे अखंड सेवा केली असेल अशा प्राथमिक प्रशिक्षित शिक्षकांमधून सेवाजेष्ठतेव्दारे भरण्यात येतील.
3. एकूण मंजूर पदापैकी भाषा-१०० टक्के (इंग्रजी-५०टक्के, मराठी- ३० टक्के, हिंदी - २० टक्के), गणित / विज्ञान - १०० टक्के, सामाजीक शास्त्रे-१०० टक्के या विषयासाठी पदाची विभागणी समप्रमाणात राहील. प्रथम भाषा म्हणून मराठी व उर्दू यांचे प्रमाण ८०/२० असे असेल.
4. पदोन्नती प्रक्रिया पदवी (५०% गुण) + बी. एड असणे आवश्यक आहे. अशा पात्र उमेदवारांची नांदेड जिल्हा परीषदेत उपस्थित दिनांकापासून सेवाजेष्ठता यादी तयार करून पदोन्नती प्रक्रिया करण्यात येईल.
5. सर्व पात्र शिक्षकांची तालुक्याकडून प्राप्त पात्र यादी नुसार संकलन करून प्राथमिक स्वरूपात आक्षेप व हरकतीसाठी यादी प्रसिध्दीस देण्यात येईल. तदनंतर योग्य आक्षेप निकाली काढून अंतीम सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द करण्यात येईल.
6. शासनाने अधिसूचना दिनांक १०.०६.२०१४ मधील तरतुदीनुसार विषयनिहाय मान्य रचनेनुसार शिल्लक असलेली पदे विषय निहाय पध्दतीने पदोन्नती व्दारे भरण्यात येतील.
7. सदर पदोन्नतीसाठी सेवाजेष्ठता तयार करत असताना नांदेड जिल्हा परीषदेत रूजू दिनांक हा सेवाजेष्ठता दिनांक गृहीत धरून तयार करावी. ज्या शिक्षकांची मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळेतील केलेली सेवा जरी जोडण्यात आली असली तरी ती सेवाजेष्ठतेसाठी ग्राहय धरण्यात येवू नये. ज्या प्राथमिक शिक्षकांची सेवा यापुर्वी जिल्हा परीषदेत केलेली आहे पण त्यांना सेवाखंड देवून परत नेमणूक देण्यात आली आहे. अशा शिक्षकाचे सेवाखंड क्षमापन मंजूर केले असेल तर त्यांची सेवा गृहीत धरण्यात हरकत नाही.
8. शैक्षणिक व व्यावसायीक अर्हते बाबतीत सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी स्वत गुणपत्रकांची शहनिशा करून पात्र शिक्षकास शासन मान्य विद्यापीठाच्या पदवीस ५० टक्के गुण असल्याबाबत व शासन मान्य विद्यापीठाची बी. एड ही व्यावसायीक अर्हता मराठी /उर्दू माध्यमातून असल्याबाबत खात्री करावी. तसेच पदवी / बी.एड परीक्षा सेवेत असताना उतीर्ण केली असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी पत्र आवश्यक आहे.
9. सदर दोन्ही माध्यमांची एकत्रित यादी विंडोज ७ मधील कोकीळा फोण्ट मध्ये सॉफट कॉपी व हार्डकॉपी यूनूस-प्रा-१- अशाखा शिक्षण विभाग प्रा यांचे कडे दिनांक २०१०.२०२२ पर्यंत न चुकता सादर करावी.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .