बुलढाणा ( शालेय वृत्तसेवा ) :
सिंदखेडराजा -आपत्ती म्हणजे अचानक आलेले संकट होय .शाळेमध्ये मानवनिर्मित किंवा निसर्ग निर्मिती मुळे धोके निर्माण होतात .यामुळे आपत्ती प्रवण क्षेत्र निर्माण होऊन असुरक्षितता निर्माण होते . तेथे संकटे घडण्याची क्षमता असल्याने तेथें जोखीम तयार होते. आपत्ती चे परिणाम कमी करण्यासाठी जोखीम कमी करण्याचे उपाय करुन उपशमन करायला हवे यासाठी आपत्ती पूर्व तयारी सज्जता, क्षमता वाढवणे , जनजागृती करणे , समाजाभिमुख उपाययोजना करून होणारी आपत्ती कमी करता येऊ शकते किंवा टाळू शकता येते.अशी माहिती लेखक व उत्कृष्ट स्काऊटर बाबाराव डोईजड यांनी संघनायक प्रशिक्षण शिबीरा मध्ये देण्यात आली.
शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक व बुलढाणा भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 29 सप्टेंबर 2022रोजी महात्मा फुले विद्यालय सिंदखेडराजा येथे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुक्यातील स्काऊट व गाईड करीता संघनायक शिबीर व स्काऊटर गाईडर शिक्षक शिक्षीका उजळणी वर्गांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरा मध्ये शाळा सुरक्षा आराखडा किती महत्वाचा आहे हे पटवून दिले. त्याच बरोबर अग्नीशमनाची माहिती यावेळी देण्यात आली.त्यांचा वापर कसा करावा त्याचे महत्त्व पटवून देऊन प्रात्यक्षिक करून दाखविले.
या शिबिराची सुरुवात स्काऊट गाईड चळवळींचे जनक लार्ड बेडन पावेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. त्या नंतर स्काऊट गाईड चळवळींचा इतिहास,नियम, वचन, प्रार्थना,झेंडा गीत,गाठी, प्रथम उपचार इत्यादी अभ्यासक्रम व प्रात्यक्षिक घेण्यात आले.कृतीयुक्त गाणी,व घोषवाक्य याचाही स्काऊट गाईड यांनी आनंद घेतला. या प्रशिक्षण शिबीरा मध्ये 250 स्काऊट गाईड मोठ्या उत्साहात सहभागी झाले.सर्व स्काऊट गाईड यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे शाळेचे पर्यवेक्षक सतिश पवार सर तर शिबीर प्रमुख म्हणून रामदास शिंगणे सर जिल्हा संघटक स्काऊट सुभाष आठवले सर जिल्हा संघटक गाईड श्रीमती मनीषा ढोके, उत्कृष्ट स्काऊटर सतिषकुमार पडूळकर, प्रेमचंद राठोड,नदीम सर व कुरुगळकर सर उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबीरा मध्ये शिक्षक व शिक्षीका, यांनी ही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .