जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन २०२२ मधील जिल्हांतर्गत बदल्यांबाबत.....
संदर्भ : १) शासन निर्णय क्र.जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४,
२) शासन निर्णय क्र. आंजिब-४८२०/प्र.क्र.२९१/आस्था-१४, दि.०७.०४.२०२१.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.
२.शासनाच्या संदर्भीय क्र. २) येथील दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
आता, शासनाच्या संदर्भीय क्र. १) येथील शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे. सदर शासन निर्णयात नमूद केल्यानुसार बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना “ विवरण पत्र-१ बदलीस पात्र शिक्षक' मध्ये (पृष्ठ क्र. १७ वर) नमूद केल्याप्रमाणे अ) (मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास, बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा) किंवा आ) (मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा) या पर्यायापैकी एक पर्याय निवडण्याची मुभा असून अशा शिक्षकांनी कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक प्रशासकीय बदलीसाठी पात्र राहतील, अशी तरतूद आहे.
३.जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत दि.०७/१०/२०२२ रोजी जिल्हा परिषद शिक्षक बदली अभ्यास गटासमवेत व्हीसीद्वारे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबतच्या संदर्भीय क्र.१) येथील दि.०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयाचे “विवरण पत्र - १ बदलीस पात्र शिक्षक” बाबत खालीलप्रमाणे अधिकचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे :-
जर एखाद्या शिक्षकांने सदर विवरण पत्र-१ मध्ये नमूद केलेला उक्त अ) येथील पर्याय निवडल्यास, अशा शिक्षकांच्या प्रशासकीय बाबीमुळे होत असलेल्या बदलीवेळी उपलब्ध असलेल्या रिक्त जागी, अशा शिक्षकांची बदली होईल. सदर बदली पूर्णत: प्रशासकीय असल्याने अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळेलच असे नाही. मात्र, जर एखाद्या शिक्षकाने सदर विवरण पत्र - १ मध्ये नमूद केलेला उक्त आ) येथील पर्याय निवडल्यास अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळू शकेल.
४.सदर बाब जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी संबंधित गट शिक्षण अधिकारी, पंचायतसमिती यांच्यामार्फत सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणावी व त्याबाबतची पोच संग्रही ठेवावी, ही विनंती.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .