रनाळे जि.प.कन्या शाळेत स्वच्छता किट व क्रीडा साहित्य वाटप

शालेयवृत्त सेवा
0

 


मुलिच्या वाढदिवसाच्या दिवशी विद्यार्थ्यांना ४२ हजाराचे साहित्य वाटप : ठाकरे परिवाराचा स्त्युत्य उपक्रम !


नंदुरबार (गोपाल गावीत) :

जि.प. कन्या शाळा रनाळे येथे स्वच्छता पंधरवड्याचे औचित्य साधून डॉ. मयूर ठाकरे व सौ.वर्षा ठाकरे यांची कन्या ओजस्वी हिच्या वाढदिवसानिमित्त एकूण १०९ मुलींना स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. यात सर्व मुलींच्या माता यांच्याकडे स्वच्छता किट तसेच क्रीडा साहित्य शाळेला कॅरम बोर्ड, लगोरी संच, दोरी उडी, चेस बोर्ड, बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक, रिंग डिश, लहान मुलांचे क्रीडा साहित्य शाळेला भेट देण्यात आले. 


जिल्हा परिषद शाळेत आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करून एक चांगला संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा अनोखा उपक्रम मुख्याध्यापक अमृत पाटील यांच्या प्रयत्नाने ठाकरे दांपत्याने घेतला. यावेळी कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य शकुंतला शिंत्रे, पंचायत समिती सदस्य बेगाबाई भिल, शेतकी संघाचे संचालक सुरेशजी शिंत्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष छायाबाई भिल, केंद्रप्रमुख वसंत पाटील ,सुभाष ठाकरे दाते डॉ. मयूर ठाकरे, वर्षा ठाकरे, शाळेचे मुख्याध्यापक अमृत पाटील, उज्वला पाटील, मंगेश वसावे व बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होते यावेळी एकूण ४२ हजाराचे साहित्य वाटप करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अमृत पाटील यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख वसंत पाटील यांनी मानले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना व पालकांना स्वच्छता पंधरवडा विषयी व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. लहान मुलांना केक बिस्किट चॉकलेट वाटप करण्यात आले. या उत्कृष्ट कार्यक्रमाची चर्चा रनाळे गावात मोठ्या प्रमाणात झाली. गावकऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल ठाकरे दांपत्याचे व शाळेचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)