जिप.उच्च.प्रा. राजगडतांडा शाळेत शिक्षकदिन उत्साहात साजरा..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजगड तांडा शाळेत त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून  शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर पुलकुंटवार यांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. 


तदनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच शाळेतील शिक्षक यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर शाळेतील मुख्याध्यापक गंगाधर पुलकुंटवार,सहशिक्षक सत्यभामा भगत,सुवर्णा वाढई,मारोती भोसले,चंद्रशेखर सर्पे,प्रेमसागर नेम्मानीवार,सुभाष पडलवार,किसन कर्णेवार, ललिता येलमेवाड यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनप्रवास तसेच आदर्श शिक्षक,आदर्श माता,आदर्श गुरू यांची गुणवैशिष्टे सांगितली. 


त्याचबरोबर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेमध्ये आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे गणवेश परिधान करून संपूर्ण शाळेचे अध्ययन अध्यापन व व्यवस्थापन पाहिले. यावेळेस या कार्यक्रमाचे प्रस्ताविक  मारोती भोसले  तर चंद्रशेखर सर्पे यांनी आभार मांडले. 


त्याच बरोबर आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमदार प्रशांत बंब यांनी पावसाळी अधिवेशन यादरम्यान विधानसभेत केलेल्या जिल्हा परिषद शाळा व शिक्षक यांच्या बद्दलच्या अपमानजनक वक्तव्याचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत शिक्षक दिन साजरा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)