जागतिक शांतता दिन मोठ्या उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी केले रशिया व युक्रेन युद्ध थांबण्याचे आव्हान !

शालेयवृत्त सेवा
0

             


 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मारतळा शाळेत वर्ग पहिली ते सातवीच्या मुलांनी जागतिक स्तरावर रशिया व युक्रेन ते युद्ध थांबले पाहिजे सर्व जगात शांतता नांदली पाहिजे हा अनोखा संदेश म्हणजे युद्ध नको शांतता हवी  शांतता हवी असे आव्हान केले. 


शाळेचे उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी जागतिक शांतता दिनाचे महत्त्व मुलांना समजावून सांगितलं नंतर वर्ग पाचवीच्या मुलांनी  आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त विविध संदेश देणारी नाटिका  सादर केली. यात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक रणजीत डीसले सर यांनी सुरू केलेल्या पीस आर्मी या उपक्रमात येणाऱ्या काळात शाळेतील सर्व मुलं सहभागी होणार असल्याचं ढगे सर यांनी सांगितले. 


पीस आर्मीच्या माध्यमातून जगातील विविध देशातील शाळेतील विद्यार्थ्यांची दूरदर्श प्रणाली द्वारे संपर्क साधून एकमेकांच्या देशाबद्दलचा आदरभाव तेथील खाद्य संस्कृती,शिक्षण पद्धती आदीबाबत माहिती जाणून घेणार आहेत सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी  शाळेचे उपक्रमशील शिक्षक रवी ढगे, जयश्री बारोळे मॅडम यांनी  परिश्रम  घेतले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक व्यंकटराव मुगावे, देवबा होळकर, प्रल्हाद पवार, श्रीमती उज्वला जोशी,  माधुरी मलदोडे  रमेश हनमंते  व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)