लोकसहभागातून धुडीपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा ५० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा..

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :

नवापूर तालुक्यातील जि. प. प्राथ. शाळा धुडीपाडा या शाळेला ५० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने ५० वा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी  नवापूर पंचायत समितीचे सदस्य राजेशदादा गावीत यांची प्रमुख उपस्थित होते. 


यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजी, माजी सरपंच , माजी विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत शाळेमध्ये केलेल्या नविन पेव्हर ब्लॉक,  जाळीदार तारेचे कंपाऊंड, नविन water - Filter (with cooling system)  या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मागील ४ वर्षात ग्रामपंचायत व शासकीय योजना मार्फत झालेल्या कामांची माहीती मुख्याध्यापक मदन मुंडे यांनी दिली. तसेच यावेळी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांचा सत्कार करण्यात आला. 


शाळेने आजपर्यंत राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहीती देण्यात आली. माजी विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती शाळेच्या या ५० व्या वर्धापनदिनी शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून अरविंद गावीत सेवानिवृत्त ना. तहसीलदार, डॉ.विनु वसावे, रिबेश गावीत, रविंद्र गावीत, शिवराम गावीत यांची उपस्थिती लाभली. यावेळी अरविंद गावीत यांनी त्यांच्या बालपणीच्या शाळेच्या आठवणी सांगितल्या व त्यांचा शैक्षणिक तसेच प्रशासकीय प्रवास कथन केला व सर्वांना कष्ट करून पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले. 


तसेच डॉ. विनु वसावे यांनी त्यांच्या काळातील शाळा- सोयी सुविधा व सध्याची शाळा यातील फरक सांगुन, जिवनात असलेले शिक्षणाचे महत्त्व  सर्वांना सांगितले. या सर्वांचा यावेळी शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. लोकसहभागातून २०,४५० रू.शाळेसाठी मदत सदर कार्यक्रम हा लोकसहभागातून घेण्यात आला व माजी विद्यार्थी अरविंद गावीत तसेच ईतर माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य व पालक या सर्वांनी लोकसहभागातून शाळेच्या  विकासासाठी मदत करून हात-भार लावला. 


कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य राजेशदादा गावीत यांनी सर्वांसाठी जिलेबी, तर शैलेश गावीत व नेहरू गावीत यांनी सर्वांसाठी नाश्ता फरसाण-चिवडा उपलब्ध करून दिला व जसु गावीत यांनी मोफत मंडप सेवा पुरवली. कार्यक्रमासाठी सरपंच उषाताई गावीत, माजी सरपंच अमेशदादा गावीत, माजी सरपंच प्रकाश गावीत, उपसरपंच लाजरस गावीत, ग्रामसेवक ज्ञानेश्वर कावळे, ग्रामपंचायत सदस्य निलामा गावीत, विमल गावीत, राहुल गावीत, अनिल गावीत, विष्णु महाराज, शरद गावीत, सुरेश गावीत, झेलाताई गावीत, परसु गावीत,जसु गावीत, चंदु गावीत तसेच गावातील बंधु -भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक मदन मुंडे यांनी केले तर उपशिक्षक रवि एकलारे यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)