मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर मॅडम यांची शाळा भेट आणि शाब्बासकीची थाप.. | CEO Varsha Thakur Ghuge

शालेयवृत्त सेवा
0

 


        

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर/घुगे मॅडम यांनी आज गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद हायस्कूल,मालेगाव येथे समग्र शिक्षा अभियानांतर्गत बांधलेल्या चार वर्ग खोली लोकार्पण सोहळ्यासाठी निमित्त उपस्थित होत्या. 

        

आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर/ घुगे मॅडम यांनी प्रशालेतील विविध उपक्रमाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी प्रशालेतील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीचा खंड आणि कोरोना काळात ऑनलाईन केलेल्या कामाचा आढावा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर/घुगे मॅडम यांना दिला. 




यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर/ घुगे मॅडम यांनी शिवा कांबळे यांनी रात्र शाळेच्या माध्यमातून केलेल्या कामाचे कौतुक केले.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले. 


यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे मॅडम, किनवटचे गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने सर, मालेगाव नगरीचे सरपंच अनिल जी इंगोले, समग्र शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता, सर्व शिक्षा अभियानाचे अभियंते उपस्थित होते. यावेळी  प्रशालेचे मुख्याध्यापक पी.एम. सूर्यवंशी सरांनी त्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)