जिल्हा प‌रिषद हायस्कुल जवळगाव शाळेचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक!

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जून २०२२ मध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा परिषद हायस्कुल जवळगाव  ता.हिमायतनगर जि.नांदेड शाळेचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. १७ विद्यार्थी परिक्षेस बसले होते त्यापैकी १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

        

शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. .

 १) मनीषा राजेश गायकवाड

 २) आश्लेषा अरविंद पवार

 ३) मुक्ताई गजानन गायकवाड

  

        

वरील सर्व विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून इयत्ता १२वी पर्यंत प्रतिमहिना १०००/- याप्रमाणे एकूण ४८०००/- स्कॉलरशीप मिळणार आहे. वरील सर्व  विद्यार्थ्यांना विषयशिक्षक चंद्रकांत कदम,वसंत गोवंदे,रमेश माळगे,वैजनाथ चेपूरवार,महेश पडगीलवार,संगमनाथ मुंडकर, श्रीमती सुरेखा कमळू,श्रीमती सारिका येरमवार,श्रीमती वंदना ढोकाडे,श्रीमती सुरेखा गुरुफळे, श्रीमती वैशाली मुस्कावाड यांनी मार्गदर्शन केले. 


मुख्याध्यापक श्री.डी.बी.शिराळे, माजी मु.अ. श्री.डी.एस.झांबरे, श्री.बी.एस.गोडाजी, युनिक कोचिंग क्लासेस, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत जवळगावच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस  शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)