जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा अंतर्गत सर्व  चौथी शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली या सभेस अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा सभापती बालाजी पाटील मारतळेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदराव ढेपे भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकाचे आई सौ सरस्वतीबाई व्यंकटराव ढगे, सरपंच प्रतिनिधी म्हणून त्यांच्या सौभाग्यवती सो मैनाबाई बालाजी बिचेवाड, केंद्रप्रमुख टी पी पाटील शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटराव मुगावे हे उपस्थित होते.


सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नवरात्राचा औचित्य साधून भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या आईच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर उपस्थित मान्यवरांचा यथोचित ग्रंथ हार शाल देऊन सन्मान करण्यात आला तर केंद्रांतर्गत आलेल्या सर्व मुख्याध्यापकांचा  जाग्यावर जाऊन येतोच सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला. 


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटराव मुगावे यांनी केले यावेळी त्यांनी शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम याबाबत माहिती नंतर शाळेच्या वतीने वर्ग पाचवी ते सातवीच्या मुलांनी नवरात्र दिनानिमित्त देवीच्या गोंधळाचे  सुंदर नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली  तसेच शाळेच्या वतीने नवरात्र निमित्ताने  रवी ढगे यांच्या संकल्पनेतून  नऊ दिवस नऊ शैक्षणिक उपक्रमांतर्गत  यात  दीक्षा ॲप चा वापर प्रभावीपणे करणे, प्रत्येक वर्गाची इंग्रजी विषयाचे ऍक्टिव्हिटी,   विज्ञानाचा नियमित दररोज एक प्रयोग,  चला फिरू जगात नऊ देश नऊ दिवस, पाढे पाठांतर स्पर्धा, इंग्रजी वाचन स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा, शेतकऱ्याची एक दिवस दिनचर्या जाणून घेणे, क्षेत्रभेट अंतर्गत पर्यटन करणे, भारत मातेचे रक्षण करणाऱ्या मात्यापित्यांचा गौरव करणे, स्वच्छता रॅली आदी उपक्रम शाळेच्या वतीने सुरू असल्याचे जाणून घेऊन मान्यवरांनी  सर्वांचे अभिनंदन केले. 


उपस्थितांना मार्गदर्शन करताना बालाजी पाटील मारतळेकर यांनी भारत मातेच्या संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या सैनिकांच्या मातेच्या हस्ते आजच्या उद्घाटन केलं हा खरंच खूप अभिमानाची बाब असल्याचे आवर्जून उल्लेख केला भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला जय जवान जय, किसान हा नारा सर्वांना सांगितला, शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक मुगावे सर, उपक्रमशील शिक्षक रवी ढगे व सर्व शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले. शिक्षक हा देशाचा कणा आहे. 


जिल्हा परिषदेच्या शाळेत गोरगरिबांची मुले शिकतात त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आपण प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना ज्ञानरजणाचे कार्य करावे येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेचे विद्यार्थी मोठमोठ्या पदावर कसे जातील या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सर्व शिक्षकांना आवाहन केले दुसऱ्या सत्रात  शिक्षण परिषदेतील विद्या प्रवेश व  एकात्मिक द्विभाषिक पाठ्यपुस्तक याविषयी सौ मंगल जिगळे, माता पालक गट, पीजीआय इंडेक्स, एक भारत श्रेष्ठ भारत आजादी का अमृत महोत्सव याविषयी रवी ढगे यांनी तर  विद्यांजली पोर्टल 2.0, रीड टू मी ॲप, तेजस पोर्टल याविषयी  दिलीप वाघमारे यांनी  विषयानुसार साधन व्यक्तींनी मार्गदर्शन केले. 


शेवटच्या सत्रात केंद्रातील विविध उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांचे उपक्रम जाणून घेतले यात येळीच्या शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वाडीकर मॅडम,भगवान पाटील सर, टाकळगाव येथील भावे सर,भोंग सर माहिती दिली. सदरील परिषदेचे सूत्रसंचालन प्रल्हाद पवार तर आभार व निपुण भारत प्रतिज्ञा देवबा होळकर यांनी सर्वांना दिली. सदरील परिषद यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक व्यंकटराव मुगावे, देवबा होळकर, प्रल्हाद पवार, रवी ढगे,बालाजी प्यारलावार, जयश्री बारोळे, माधुरी मलदोडे, रमेश हनमंते आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)