जिल्हा प‌रिषद खडकी बाजार शाळेचे पाच विद्यार्थी स्कॉलरशिप पात्र..

शालेयवृत्त सेवा
0

 


इम्रानखान पठाण व अमोल जाधव या शिक्षकांने केले मार्गदर्शन


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा) येथील जून २०२२ मध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा खडकी बाजार ता.हिमातनगर जि.नांदेड शाळेचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत.

 

त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. १५ विद्यार्थी परिक्षेस बसले होते त्यापैकी १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ५ विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत.


        शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. 


 १) प्रणाली राजरत्न हनवते

 २) निकिता शंकर शिरगिरे 

 ३) जान्हवी संतोष मोरे  

  ४) ममता बालाजी नारखेडे

  ५) परमेश्वर दत्ता ताटिकोंडलवार 


   

वरील सर्व विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता १२  वी पर्यंत महिना एक हजार याप्रमाणे ४८००० हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांना  इम्रानखान पठाण व अमोल जाधव सर यांनी मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांचे अभिंनदन मुख्याध्यापक श्री भूतनर एम.एस‌.तसेच शाळेतील अध्यापक सतिष इंगळे सर, गणेश राचूरे,  श्याम रायेवार,  जाधव शंकर, नागरगोजे नागनाथ, श्रीमती माळी मॅडम  यांनी केले. 


शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.ज्योती तानाजी सोळंके व उपाध्यक्षा सौ.सुरेखा गजानन सूर्यवंशी तसेच गावच्या सरपंच सौ.प्रिती संजय सूर्यवंशी व ग्रामपंचायत खडकी बाजारच्या वतीने विद्यार्थांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस  शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)