जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जामणी येथे मुख्याध्यापक सभा संपन्न

शालेयवृत्त सेवा
0




यवतमाळ ( शालेय वृत्तसेवा ) :

पंचायत समिती झरी केंद्रांतंर्गत सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सभेचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जामणी येथे  करण्यात आले होते .या मुख्याध्यापक सभेला अध्यक्षस्थानी जि.प.उच्च प्राथमिक शाळा सुर्लाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री.रमेश बोबडे सर  तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.प्राथमिक शाळा कोडपाखिंडीचे मुख्याध्यापक श्री.गायकवाड सर व जि.प.उच्च प्राथमिक शाळा झमकोला चे मुख्याध्यापक श्री.आनंदकुमार शेंडे सर उपस्थित होते.



यावेळी केंद्रप्रमुख श्री.विनोद मडावी सर यांनी निपुण भारत उपक्रमाची अंमलबजावणी व सर्व  अंतर्भूत   विषयांवर आधारित यथोचित मार्गदर्शन केले .तसेच  पुढील मासीक केंद्रसंमेलनाचे नियोजन करण्यात आले. सु्र्ला, वाढोणा(बंदी), झमकोला, निमणी यापध्दतीने २०२२ वर्षाअखेर पावेतो नियोजन करण्यात आले.



सभेतील खालील  विषयांवर मार्गदर्शन व सोबतच चर्चेतून गुणवत्ता विकासाबाबत सर्वच शाळेच्या मुख्याध्यापकांची  मते जाणुन घेण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी सर्व  शिक्षक कटीबद्ध असल्याचे  मुख्याध्यापक यांचे वतीने प्रतिपादन करण्यात आले.



१) जलजीवन मिशन

२) पंधरावा वित्त आयोग

३) झेप उपक्रम

४) बाला (BALA)

५) जिर्ण ईमारतींचे निर्लेखन प्रस्ताव  सोबत आणावे. प्रस्तावासोबत शाळा व्यवस्थापन समिती ठराव , ग्रामपंचायत ठराव जागेचा आठ अ, जीर्ण इमारतीचे फोटो.

६) विज्ञान मेळावा वक्तृत्व स्पर्धा .

७) दिनांक 13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत कुष्ठरोग शोध व सक्रिय क्षयरोग शोध मोहीम करिता रॅलीचे आयोजन

८) शालेय पोषण आहार डीबीटी विद्यार्थी योजना.

९) गोपनीय अहवाल शैक्षणिक सत्र 2021 -22

१०) PFMS शालेय गणवेश प्राप्त निधी सध्या स्थिती.

   


ईत्यादी विषयावर मुख्याध्यापक सभा आयोजीत करण्यात आली होती व या सर्वच विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.या सभेचे प्रास्ताविकपर मार्गदर्शन श्री.विनोद मडावी सर यांनी तर आभारप्रदर्शन श्री . निलेश शेंडे यांनी केले.अल्पोपाहारानंतर मुख्याध्यापक सभेची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)