...अखेर मा. मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांचा निघाला आदेश : नक्षलग्रस्त / आदिवासी क्षेत्रातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी ! | ZP Yavatmal

शालेयवृत्त सेवा
0



यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या पाठपुराव्याला मोठे यश..! 

306 शिक्षकांना मोठा दिलासा ।


यवतमाळ ( सुरेश मुनेश्वर ) :    

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या ४ मार्च २०२२ च्या च्या पत्रानुसार १२ वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांची एकस्तर वेतनश्रेणी बंद करून  कालबद्ध पदोन्नती लागू केली सोबतच अतिरिक्त  प्रदान वसुलीचे पत्र काढले.

या विरोधात यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव सर यांच्या मार्गदर्शनात आसाराम चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

         

याप्रकरणी न्यायालयाने संघटनेच्या बाजूने निर्णय देऊन याचिकेवर अंतरिम आदेश पारित केले. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत आज यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मा.श्रीकृष्ण पांचाळ साहेब यांनी आदेश काढले.

             

या निर्णयाने यवतमाळ जिल्ह्यातील नक्षलग्रस्त/आदिवासी क्षेत्रातील आर्णी,घाटंजी,पांढरकवडा, झरी,राळेगाव,यवतमाळ,मारेगाव,कळंब या पंचायत समितीतील याचिकेत समाविष्ट असणाऱ्या 306 शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)