जिल्ह्यातील प्राथमिक ३८८ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर

शालेयवृत्त सेवा
0

 



प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश !

 

नंदुरबार दि.७ (शालेय वृत्तसेवा) :

नंदुरबार जिल्ह्यातील  प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात प्रहार शिक्षक संघटनेने ना.बच्चुभाऊ कडू मा.शालेय शिक्षण राज्यमंत्री, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमाताई वळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड.रामभैय्या रघुवंशी, शिक्षण सभापती अजित नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्या कडे वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. 



निवेदनाची दखल घेऊन १ जानेवारी २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या काळात १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याचे प्रस्ताव मागील दोन वर्षांपासून प्रलंबित होते. कोरोना काळात कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग, पी आर सी दौरा यामुळे वारंवार ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी विलंब होत गेला. आज अखेर ३८८ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. 



वरिष्ठ वेतनश्रेणी लागू झाल्याने शिक्षकांच्या वेतनात फारसा फरक पडणार नसला तरी वेतन आयोगाच्या त्रुटी दूर करण्यासाठी संघटना राज्य स्तरावर प्रयत्न करत आहे. वेतन आयोगाच्या त्रुटी दूर झाल्यास त्याचा शिक्षकांना चांगला फायदा होईल. शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार परिवाराच्या वतीने नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनुस पठाण, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, प्रशासन अधिकारी सुभाष मारनार, कनिष्ठ सहाय्यक सुनिल गिरी, तसेच सामान्य प्रशासन विभाग सर्व अधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. 


नंदुरबार जिल्ह्यातील ३३८ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर केल्याबद्दल नंदुरबार जिल्हा परिषद आणि प्राथमिक शिक्षण विभागाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. पुढील काळात उर्वरित त्रुटींमुळे बरेच शिक्षक बांधवांचे वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ मंजूर करण्याची प्रक्रिया सुलभ आणि गतिमान व्हावी, ही प्रशासनाला विनंती केली आहे. यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, कार्याध्यक्ष विश्वास देसाई, जिल्हा संघटक गणेश पाटील, प्रसिद्धी प्रमुख धरमदास गावीत यांनी मत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)