राज्यातील २० शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार' जाहीर.. | Shikshk Dheyay

शालेयवृत्त सेवा
0



पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील शिक्षकांसाठी 'कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा'साठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावरील या स्पर्धेमागे शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच मुख्य उद्देश होता. शिक्षकांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली गेली आहे.



राज्यातील शिक्षकांमधून दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. 

A) प्राथमिक गट (अंगणवाडी ते सातवी) 

B) माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (आठवी ते पदवीधर पर्यंत.) 


A आणि B गटातील प्रत्येकी प्रथम दहा विजेत्या शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र कुरिअरने घरपोच पाठविण्यात येईल. तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.



डॉ. संदीप ज्ञानदेव मुळे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार आणि डॉ. बाबासाहेब गणपत बडे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.


स्पर्धेतील विजेते -


A) प्राथमिक गट (अंगणवाडी ते सातवी)


1.  राहुल खासेराव धुमाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दुगलगाव, ता. येवला, जि. नाशिक  


2.  प्रकाश भिमराव हेडावु, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इटान – २, केंद्र मोहरणा, ता. लाखांदूर, जि. भंडारा


3.  श्रीमती सुप्रिया गेनबा आगवणे (कणसे), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रेडणी, ता. इंदापूर, जि. पुणे


4.  श्रीमती सारिका शेखरराव पाटील, महानगरपालिका शाळा क्रमांक ४७, आगर टाकळी, नाशिक


5.  गोपाल वसंतराव खाडे, जिल्हा परिषद विद्यालय, कामरगाव, ता. कारंजा (लाड), जि. वाशिम


6.  पांडुरंग विष्णू दळवी, नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग


7.  प्रियदर्शनी ज्ञानेश्वर मोंदेकर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डिफेन्स हिंदी, दवलामेटी टोली, जि. नागपूर


8.  अक्षय विलासराव न्यायाधीश, ज्ञानेश्वरी गुरुकुल, गणोरी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद


9.  सुनंदा अर्जुन नेमाडे, जिल्हा परिषद केंद्र शाळा वाकोद, ता. जामनेर, जि. जळगाव


10.        श्रीमती झिनत जावेद खान, अंजुमन ए इस्लाम खलिफा जियाउद्दिन गर्ल्स प्रायमरी स्कूल, माहीम, मुंबई


B) माध्यमिक व उच्च माध्यमिक गट आठवी ते बारावी (पदवीधर पर्यंत).


1.  योगेश चंद्रकांत नाचणकर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी चिंचघरी, सती, ता. चिपळूण जि. रत्नागिरी


2.  सुरेश बन्सी उतपुरे, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, घिर्णी, ता. मलकापूर, जि. बुलडाणा  


3.  रवींद्र आनंद सपकाळे, ज्ञानप्रकाश विद्यालय, भटवाडी, घाटकोपर (प.), मुंबई


4.  श्रीमती वनिता चंद्रभान दयाटे, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, वैजापूर, जि. औरंगाबाद 


5.  महेन्द्र भुवराज सोनेवाने, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आमगाव, शास्त्री वार्ड, जिल्हा गोंदिया


6.  नितीन काशिनाथ साळुंके, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, ब्राम्हणी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद


7.  चेतन रमेश पाटील, श्री. सातपुडा वैभव विद्यालय, वाण्याविहीर, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार


8.  डॉ. तुकाराम बाबुलाल साळुंखे, श्री शिवाजी विद्या मंदिर आणि ज्युनिअर कॉलेज, औंध, पुणे


9.  अनुप कुलकर्णी, बाल विद्या प्रसारक मंडळ, आदर्श प्राथमिक व माध्यमिक इंग्रजी माध्यम शाळा, सी. बी. एस. नाशिक


10.   प्रधान सुरेश कुळकर्णी, रा. ज. ठाकूर विद्यामंदिर, लोकमान्य नगर, ठाणे.                                          



सर्व विजेत्यांचे शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार, कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे, मुख्य सहायक संपादक रमेश खरबस तसेच संपादकीय मंडळ आणि शिक्षक ध्येय परिवार महाराष्ट्र यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)