ऐतिहासिक वारसा असलेल्या मरळक येथील पुरातन हेमांडपंथी विमलेश्वर देवस्थानच्या सांभामंडपात केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 


     

 नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

निळा संकुलाची शिक्षण परिषद जि.प.प्रा.शा.मरळक ( बु),येथे संपन्न झाली.ऐतिहासिक वारसा असलेल्या मरळक येथील पुरातन हेमांडपंथी विमलेश्वर देवस्थानच्या सांभामंडपात परिषद घेण्यात आली.शाळा निसर्गरम्य,स्वच्छ सुंदर,श्री धोपटे सर केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापिका वाटेगावकर मॅडम व सर्व गुणवंत शिक्षक यांच्या प्रयत्नाने शाळेला नवे रूप प्राप्त झालेआहे,त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. गावातील या शाळेची विध्यार्थिनी MBBS च्या प्रवेश्यास पत्र ठरली या बद्दल सर्वांचेव अभिनंदन.


पहिल्या उद्घाटनीय सत्रात:-  कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बालाजीराव नामदेवराव कदम उपसरपंच मरळक बु.,श्री शिवदास कदम (अध्यक्ष शा.व्य.स.) मरळक आणि मंचावर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घघाटन झाले.आणि इयत्ता पाचवीतील मुलांनी सुंदर स्वागत गीत गाऊन शब्द सुमनाने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा सनमन करण्यात आला.त्यात ब्लजीराव कदम उपसरपंच,शिवदास कदम अध्यक्ष शा.व्य.स. मा.गटशिक्षणाधिकारी श्री नागराज बनसोडे साहेब. मा.विश्वाभर धोपटे सर (केंद्र प्रमुख-निळा ),मा कैलास पिराजी पोहरे सर (केंद्रीय मुख्याध्यापक,निळा ) मा रमेश गोवंदे सर उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रा.शा.तळणी, मा.वाघमारे सर पदोन्नत मुख्याध्यापक प्रा.शा.पिंपरी म. मा.श्रीकांत कुलकर्णी सर पदोन्नत मुख्याध्यापक प्रा.शा.एकदरा,मा.पडगीलवार सर पदोन्नत मुख्याध्यापक प्रा. शाळा पुयनी,संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय तळणी मुख्याध्यापक,जिल्हा परिषद हायस्कुल लिंबगाव चे मुख्याध्यापक प्रतिनिधी बुयरे सर,पदमश्री श्री श्यामराव कदम विद्यालय लिंबगाव,आणि अंतर्गत चे सर्व मुख्याध्यापक आणि इयत्ता पहिली ते आठवी ला ज्ञानदान करणारे सर्व शिक्षक वृंद यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रशासकीय माहिती मा.केंद्रप्रमुख श्री धोपटे सर यांनी दिली.मा.नागराज बनसोडे साहेब गटशिक्षणाधिकारी पं.स.नांदेड यांनी सध्यास्थितीतील कामे, अडचणी.उपाय यावर मार्गदर्शन केले.मार्मिक आणि मोजक्या शब्दात आपली शक्षनाविषयीं ची तळमळ व्यक्त केली.तसेच दिवाळी च्या सुट्टीत ऐछीक वाचन लेखन चा सात दिवशीय उपक्रमम राबवण्याचा मनोदय व्यक्त केला.आजचे विषय शिकवणारे सुलभक यांना आपल्या तासिकेच्या विषयाबद्दल थोडक्यात माहिती विचारली.


मा.गटशिक्षणाधिकारी साहेबांच्या हस्ते ज्यांचा आज वाढदिवस होता त्या डोईजड मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.पुयनी येथील विज्ञान प्रदर्शनात पारितोषिक मिळऊन देणाऱ्या बच्चेवार मॅडम,निळा येथील रत्नपारखी मॅडम,वाघमारे मॅडम,चिखली खु.चे किशोर नरवाडे सर,मरळक खु.च्या मुख्याध्यपिका धोत्रे मॅडम आणि नितीन दुगाणे सर यांचा त्यांच्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.समर्पक आणि अचूक उत्तरे वाघमारे मॅडम, धोत्रे मॅडम यांनी दिले. डोईजड मॅडम आणि जाधव सर यांनी बहारदार सुत्रसंचालन केले-मा.किशोर नरवाडे सर यांनी आभार मानले. अतिशय आनंदात सकाळी 11:00 ते 4:15 वा पर्यंत शिक्षण परिषद चालली श्री पतंगे सर यांनी परिषदेच्या पूर्ण कार्यक्रमाचे फोटो काढण्याचे काम पार पाडले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)