निधी अभावी शिक्षक भरतीवर संक्रांत!

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाने 21 सप्टेंबर 2022 रोजी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांना एक परीपत्रक पाठवले आहे या परिपत्रकाद्वारे शिक्षण विभागातील रीक्त पदांची माहिती मागितली आहे. 


या पत्रातील विषय आहे कोव्हीड १९ या संसर्गजन्य अर्थव्यवस्थेवरील परिणामांबावत वित्तीय उपाययोजना करण्याअंतर्गत घातलेली पदभरती बंदीबाबत.  विषयाच्या अनुषंगाने वित्त विभागाने उपस्थित केलेल्या खालील मुद्यांबाबतचे स्पष्टीकरण व माहिती तात्काळ शासनास सादर करण्याची विनंती शासनाने केली आहे. 


१) दि. २८ ऑगस्ट, २०१५ च्या शासन निर्णयानुसार जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या तसंच संचमान्यतेनुसार मंजुर शिक्षक/ शिक्षकेत्तर पदे भरलेली पदे व रिक्त पदे याची माहिती द्यावी .


२) जिल्हानिहाय अतिरिक्त शिक्षक असतील तर त्या शिक्षकांची माहिती द्यावी. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनावावत काय कार्यवाही केली आहे.


३) शा. नि. दि. २८ ऑगस्ट २००५ नुसार संचमान्यतेनुसार शिक्षक पदांची मागणी केली आहे किंवा कसे ?


४) राज्यात ० ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किती आहेत. सदर शाळा बंद करणेबाबत विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे.


५) विभागाने ६७७५५ रिक्त पदे भरण्याची विनंती केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पदे भरली गेल्यास राज्य शासनावर खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार येणार आहे.


६) राज्य शासनाच्या एकूण खर्चापैकी सुमारे १८ टक्के निधी शालेय शिक्षण विभागावर खर्च होतो. त्यातही महसुली खर्चापैकी मोठ्या प्रमाणात निधी हा वेतनावर खर्च होत आहे.


या परीपत्रकामुळे शिक्षण क्षैत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली.शिक्षण विभागात(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) सुमारे एक लाख पदे रिक्त आहेत. 


भरती प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाला लागू करून शिक्षकांशिवाय शाळा सुरू कशा राहणार? याचा विचार शासन कधी करणार? १५ आँगस्ट २०१५ च्या शासन निर्णयामुळे यापूर्वीच कमी केलेले कला-क्रीडा शिक्षक संचमान्यतेत पुन्हा आलेले नाहीत. विषयाला शिक्षक नसल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. ११  डिसेंबर २०२० मध्ये पन्नास हजार शिपाई पदेही संपुष्टात आणली आहेत.


सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील राज्यव्यापी आंदोलनासाठी तयार रहा.असे आवाहन शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सोशल मीडिया द्वारा केले आहे. 


मुंबईतील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शारीरिक शिक्षक, चित्रकला शिक्षक यांची पदे भरण्यात आली नाहीत. अनेक शैक्षणिक संस्था मध्ये विशेषतः अल्पसंख्याक शाळा मध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. शिक्षक पात्र परीक्षांचा गोंधळ. अनुदानाचा प्रश्न व शिक्षक भरतीस गेली अनेक वर्षांपासून बसलेला खिळ यामुळे शिक्षण क्षेत्रात चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. नवे सरकार लवकरच यावर योग्य तो विचार करेल व शिक्षण क्षैत्राला संजिवनी देईल असा विश्वास विजय महाजन सरांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)